पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा : निलेश सोनावणे रिपाई पनवेल शहर अध्यक्ष

पाचशे चौरस  फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा  : निलेश सोनावणे रिपाई पनवेल शहर अध्यक्ष


पनवेल /प्रतिनिधी
पनवेल चे नागरीकरण वाढत आहे ,वाढती महागाई हि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे ,सर्वसामान्य नागरिकांना  अप्लाय स्वप्नातील घर घेणे अवघड झाले आहे तर ज्यांनी घरे घेतली आहेत त्यांना गृह कर्जाचा  इएमआय ,महावितरण चे वाढीव वीजबिल,इमारतीचा  मेन्टेनन्स  चार्ज अशा अनेक खर्चाना  सामोरे जावे लागत असल्याने किमान पनवेल महानगर पालिकेने  पाचशे चौरस  फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानगर पालिकेकडे केली आहे
              पनवेल महानगर पालिका क्षेत्रात अल्प उत्पन्न गट ,मध्यमवर्गीय मोट्या प्रमाणात वास्तव्यास आहेत त्यामुळे पनवेल महानगर पालिकेचा मालमत्ता कर भरणे जिकरीचे जात आहेत आधीच उत्पन्न  कमी ,वाढती महागाई त्यात दैनंदिन  गरजा , मुलांचे शिक्षण आरोग्य या वर देखील वारेमाप खर्च होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर कराचा बोजा अधिक होत आहे म्हणून पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट द्यावी ,मालमत्ता कर माफ करण्यात यावा अशी  मागणी पनवेल शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पनवेल सहर्ष अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानग पालिकेकडे  निवेदनाद्वारे केली आहे  .

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image