राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा



समाजोपयोगी उपक्रमांमधून जपली सामाजिक बांधिलकी

पनवेल (प्रतिनिधी) माणुसकीचे नाते जपणारे, सर्व समाजघटकांना आपलेसे करणारे आणि सतत जनसामान्यांच्या समस्यांसाठी कटिबद्ध राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस शनिवारी (२२ नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करत साजरा करण्यात आला.

या निमित्ताने विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अरुणशेठ भगत यांचे अभिष्टचिंतन केले. यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितिन पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, मंडल अध्यक्ष, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच विविध संस्था-संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी अरुणशेठ भगत यांचे अभिष्टचिंतन केले. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.   अरुणशेठ भगत यांनी वर्षानुवर्षे सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवही यावेळी उपस्थित मान्यवरांनी केला. 


Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image