कट्टर शिवसैनिक राहुल गोगटे यांची मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ५१ हजार रुपयांची मदत
पनवेल दि.२१(वार्ताहर): पनवेल मधील शिंदे गटाचे कट्टर शिवसैनिक राहुल गोगटे यांची मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ५१ हजार रुपयांची मदत केली आहे.
या मदतीचा धनादेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहुल गोगटे यांनी सुपूर्द केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठनेते व माजी नगरसेवक श्रीनंद पटवर्धन उपस्थित होते.
