पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीत उतरणार विद्या तामखेडे, राजकारणासोबत समाजकारणातही आघाडी महिलांसाठी सातत्याने काम करणारी निर्भीड कार्यकर्ता

पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीत उतरणार विद्या तामखेडे, राजकारणासोबत समाजकारणातही आघाडी महिलांसाठी सातत्याने काम करणारी निर्भीड कार्यकर्ता


पनवेल : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून,लवकरच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागणार आहेत. महानगरपालिकेत पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी असल्याने कामोठे प्रभाग क्र.१३ मधून महिला राखीव जागेसाठी विद्या तामखेडे उतरणार आहेत. ह्या प्रभागात शेकाप आणि भाजपा अशी चार जागेसाठी लढत मागील निवडणुकीत पहायला मिळाली होती. यावेळी शेकाप आणि भाजपा यांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या. राजकारणासोबत समाजकारणातही आघाडी, महिलांसाठी सातत्याने काम करणारी निर्भीड कार्यकर्ता म्हणून विद्या तामखडे यांची ओळख आहे. प्रामुख्याने धनगर समाजाच्या तर सर्व धर्म समभाव धरून सातत्याने समाजाची सेवा करण्यात त्या नेहमीच पुढे राहिल्या. पनवेल महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार म्हणून पुढे येत असून,त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

       गेल्या अनेक वर्षांपासून आ.प्रशांत ठाकूर यांच्या विकासकामांच्या कार्य कर्तृत्वाने प्रभावित होऊन अहोरात्र जनतेसाठी वाहून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकारण करत असलेल्या तसेच समाजकारणातही ठसा उमटवला आहे. रुग्णालयात निराधार महिलांना मदत करणे त्यांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबविणे, महिलांच्या मूलभूत सुविधा निवारण केंद्रांतील मदतकार्य असो, मध्यमवर्गीयांना समाजात भेडसावणाऱ्या समस्याचे शासन दरबारी मदत करणे सामाजिक उपक्रम असोत, त्या नेहमीच महिलांच्या न्यायासाठी, समस्यांसाठी आणि सक्षमीकरणासाठी पुढाकार घेताना दिसतात. पक्षाच्या प्रत्येक मोर्चे आंदोलन व सभांमधून महिलांचे नेतृत्व म्हणून महिला आघाडीच्या उपक्रमांमध्ये नेतृत्वाची भूमिका निभावली आहे. वंचित घटक, गरजू महिला, तरुणींना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि मार्गदर्शन उपक्रम राबवले आहेत. पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा, स्वच्छतेचा विषय असो किंवा न्याय हक्काचा त्या कायम एक रणरागिणीच्या भूमिकेत सर्वांच्या पुढे उभे राहून प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात.

          महिला आरक्षणाच्या या निवडणुकीत प्रभाग क्र.१३ मधून त्यांनी उमेदवारी करण्याचा ठाम निश्चय केल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. महिलांच्या प्रश्नांवर काम करणारी, जमिनीवर उतरून समस्यांकडे लक्ष देणारी व्यक्ती म्हणून तामखडे या खऱ्या अर्थाने जनतेच्या उमेदवार आहेत असे नागरिकांनी सांगितले. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक तरुणाई, महिला वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असून सेवा हाच धर्म ही भूमिका घेऊन त्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image