नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सने केला अवयवदात्या कुटुंबियांचा सन्मान

नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सने केला अवयवदात्या कुटुंबियांचा सन्मान


 *जागरूकता सत्राच्या माध्यमातून पटवून दिले अवयव दानाचे महत्त्व* 


 *नवी मुंबई:* जागतिक अवयवदान दिनानिमित्त अवयवदान करणाऱ्या व्यक्तींच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करत नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सने अवयवदात्यांच्या कुटुंबीयांना यावेळी सन्मानित केले. आपल्या प्रिय व्यक्तीचे अवयव दान करून गरजुंना नवे आयुष्य देणाऱ्या कुटुंबीयांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि इतरांना त्यांच्या कार्याचे अनुसरण करण्यास प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश होता. 

रुग्णालयाने अवयवदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी आणि त्याबाबत असलेले गैरसमज करण्यासाठी डॉक्टर, प्रत्यारोपण समन्वयक आणि दात्या कुटुंबियांच्या उपस्थित जनजागृती व्याख्यान आणि संवादात्मक सत्राचे आयोजित केली होते. *या ठिकाणी आयोजित चर्चा सत्रातत डॉ. सनिश श्रृंगारपुरे, डॉ. विकास भिसे, डॉ. अमित नागरीक, डॉ. अमर कुलकर्णी, डॉ. रावसाहेब राठोड, डॉ. दीपक अहिरे आणि डॉ. अदिती जैन यांचा समावेश होता.* 

मेडिकव्हर हॉस्पिटल्स हे विविध कार्यक्रमांद्वारे अवयवदानाविषयी जागरूकता वाढवत आहे. हा कार्यक्रम केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच नाही तर इतरांना अवयवदानाबाबत प्रेरणा देणारा होता. जगण्याची दुसरी संधी देणाऱ्या या दात्यांचे स्मरण करून, आम्ही या निस्वार्थ कार्यात सामील होण्यासाठी आम्ही नागरिकांना आवाहन करतो *अशी प्रतिक्रिया मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी स्पष्ट केले.* 

 *दाता कुटुंबातील सदस्य समीर पाटील सांगतात की,* आपल्या प्रिय व्यक्तीला गमावणे हे खरोखरच मन हेलावणारे असते, परंतु त्यांच्या अवयवांनी इतरांना नवीन जीवन दिले हे जाणून आपल्याला त्यांना कायमस्वरूपी स्मरणात ठेवता येते. आमच्या योगदानाची दखल घेणाऱ्या तसेच नागरिकांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजित केल्याबद्दल आम्ही मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे विशेष आभार मानतो. यामुळे आम्हाला असे वाटते की आपल्या प्रिय व्यक्तीचा वारसा हा त्यांनी प्राप्तकर्त्यांच्या माध्यमातून कायमजिवंत राहील. यावेळी उपस्थिताना अवयवदानासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.