७७ वर्षीय मधुमेही रुग्णावर यशस्वी कोपर(एल्बो) प्रत्यारोपण;दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना आले यश

 ७७ वर्षीय मधुमेही रुग्णावर यशस्वी कोपर(एल्बो) प्रत्यारोपण;दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना आले यश



 *नवी मुंबई:* मेडिकव्हर रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. निकिल भारंबे यांच्या नेतृत्वाखाली टिमने गंभीर संधिवात आणि हाताच्या हालचालींवर मर्यादा आलेल्या ७७ वर्षीय मधुमेही व्यक्तीवर यशस्वी कोपर(एल्बो) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. सुमारे ३ तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या केवळ वेदनाच कमी झाल्या नाही तर त्याच्या हाताच्या हालचालींमध्येही सुधारणा दिसून आली. रुग्ण आता स्वतःच्या हाताने जेवतो, लिहितो तसेच दैनंदिन कामांसाठी त्याला आधाराची गरज भासत नाही. 

 *खारघर येथे राहणारे श्री रामचंद्र तलप* या रुग्णाला हाताच्या उजव्या कोपऱ्याला गंभीर ऑस्टियोआर्थरायटिसचा त्रास सतावू लागला, ज्यामुळे रुग्णाला त्याचा हात पूर्णपणे वाकवता येत नव्हता. रुग्णाला जवळजवळ १ वर्षापासून ऑस्टियोआर्थरायटिस आणि गेल्या १५ वर्षांपासून मधुमेह होता आणि त्याचबरोबर कोपरावर दोन वेळा पडून आघात  झाल्याचा वैद्यकिय इतिहास होता. त्यापैकी एका आघातामुळे उजव्या बाजूस रेडियल नेक फ्रॅक्चर झाले होते. सुरुवातीला प्लास्टर कास्टने उपचार करण्यात आले मात्र दुर्दैवाने, हे फार काळ टिकले नाही. वारंवार पडल्यामुळे सांध्यांच्या कार्यात बिघाड होऊन दैनंदिन कामांमध्ये रुग्णाला वेदना सतावू लागल्या. रुग्णाला दैनंदिन कामांसाठी कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून रहावे लागत होते.


दुखापतींच्या घटना आणि अनियंत्रित रक्तातील साखरेच्या पातळीमुळे रुग्णाचा संधिवात वाढला, ज्यामुळे त्याला स्वतःच्या हाताने जेवायला देखील अशक्य झाले. वेदनेच्या तीव्रतेमुळे रुग्णाला नैराश्य आले. इतरांवर अवलंबून रहावे लागत असल्याने तो खचून गेला होता. त्यानंतर रुग्णाने मेडिकव्हर हॉस्पिटलकडे धाव घेतली जिथे त्याला जगण्याची नवी दिशा मिळाली.


 *ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. निखिल भारंबे सांगतात की,* रुग्णाला  होणाऱ्या वेदना आणि स्वतच्या हाताने जेवता न येणे यामुळे रुग्ण निराश झाला होता. आम्ही रुग्णाची संपुर्ण तपासणी केली. सविस्तर तपासणी आणि समुपदेशनानंतर आम्ही रुग्णाचे कोपर(एल्बो) प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. ही एक दुर्मिळ आणि आव्हानात्मक प्रक्रिया होती. भारतात 5% पेक्षा कमी रुग्णांच्या बाबतीत अशी शस्त्रक्रिया केली जाते.


 *डॉ. निखिल भारंबे पुढे सांगतात की,* या शस्त्रक्रियेचा उद्देश हा निकामी झालेले सांधे काढून टाकणे आणि त्या जागी ३ तास चालणाऱ्या शस्त्रक्रियेत कोपराटला जोडणाऱ्या सांधा हा धातूने जोडला गेला . ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची आहे कारण यात हाताच्या हाडाचा खालचा भाग कापला जातो, जो नाजूक असतो आणि शस्त्रक्रियेदरम्यान फ्रॅक्चर होऊ शकतो, ज्यामुळे शस्त्रक्रियेचा परिणाम बिघडू शकतो. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या कोपराची हालचाल सुधारली असून १० ते १२० अंशांपर्यंत हात हलविता येऊ लागला, ज्यामुळे तो स्वतःच्या हाताने जेवणे तसेच आवश्यक दैनंदिन कामांना रुग्णाने सुरुवात केली. जेव्हा रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा तो भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाला होता, त्याच्या हाताच्या कोपऱ्याच्या स्नायुंमधील हलचाल मंदावल्याने तो स्वतःच्या हाताने जेवू शकत नव्हता. या शस्त्रक्रियेचा उद्देश केवळ रुग्णाच्या वेदना कमी करणे नाही तर त्याच्या हाताची हलचाल पूर्ववत करणे हा होता.

मी अशा टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे मी जेवणासाठी चमचा देखील धरु शकत नव्हतो. सौंदर्यप्रसाधनांचा वापर किंवा फक्त हात हलवणे यासारख्या साध्या गोष्टींकरिका देखील संघर्ष करावा लागत होता. हळूहळू मला नैराश्य येऊ लागले. मात्र जेव्हा मी डॉ. भारंबे यांना भेटलो तेव्हा मला जगण्याची दुसरी संधी गवसली. आज, मी स्वतःच्या हाताने जेवतो, हाताची हालचाल करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला पुन्हा पुर्वीसारखे सामान्य आयुष्य जगता येत आहे. यासाठी मी संपुर्ण टिमचे मनापासून आभार मानतो *अशी प्रतिक्रिया रुग्ण रामचंद्र तलप यांनी व्यक्त केली.*