खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन

 आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन


खारघर/प्रतिनिधी,दि.१- खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने पनवेलचे आमदार माननीय प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मागील अनेक वर्षांपासून विविध क्रीडा विषय तसेच सामाजिक उपक्रम राबवत प्रशांत दादांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी प्रि-इंटर स्कूल (Pre-InterSachool) बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन खारघर सेक्टर 19 प्लॉट नंबर 59 या खेळाच्या मैदानावर एक दिवसीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये 14 वर्षातील मुले व मुलींचे संघ तसेच सतरा वर्ष वयोगटातील मुले व मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण प्रकाश पाटील तसेच पनवेल महानगरपालिकेच्या मा नगरसेविका व खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या सेक्रेटरी नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत दादा ठाकूर, आमदार तथा महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष विक्रांत दादा पाटील, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश दादा ठाकूर, भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी,पनवेल महानगरपालिकेचे सुरक्षा अधिकारी व स्टेट बॉक्सिंग प्लेयर सिद्धेश टावरी, पॅराडाईज ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष भतीजा यासह इतर मान्यवर उपस्थित असणार आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क : इम्तियाज 

+918652709004 व प्रिन्स +919004853023.