वाहतूक उल्लंघन करणाऱ्यांना *सुरक्षाराखी;उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक
*हेल्मेट परिधान न करणाऱ्यांना क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे सुरक्षाराखी
पनवेल/प्रतिनिधी,दि.११- सालाबादप्रमाणे यंदाही क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदाचे 8 वे वर्ष असून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ रुपालीताई शिंदे या विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात, युवा व डेशिंग असे व्यक्तिमत्व सौ.रुपालीताई शिंदे ह्या सामाजिक कार्यात स्वतःला पूर्ण झोकून विविध कार्यक्रम राबवत असतात, महिलांच्या समस्यांना सतत झटणाऱ्या रुपालीताई शिंदे यांनी यावर्षी देखील वाहतूक शाखेचे नियमन न करणाऱ्या व नियम न पाळणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना थांबवून त्यांना रक्षाबंधन दिनानिमित्त सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे असे सांगण्यात येते. भाऊ बहिणीची रक्षा करण्याचे वचन रक्षाबंधन दिवशी दिले जाते त्याचप्रमाणे आम्हा फाउंडेशनच्या महिला नियम न पाळणाऱ्या भावांना राखी बांधून त्यांचे रक्षण व्हावे, त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा अशी इच्छा व्यक्त करत हा रक्षाबंधनाचा पवित्र सण गेले ८ अवरीत सुरु असलेले क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन मार्फत साजरा करण्यात आला, त्याच बरोबर वाहतूक विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी हे देखील सणाच्या दिवशी सुट्टी न घेता आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना देखील सुरक्षाराखी बांधून राखी बांधण्यात आली.
वाहतुकीचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसांनी पकडल्यानंतर 'तोडपाणी' करणे किंवा त्याच्याशी हुज्जत घालून आपण कसे चूक नाही, हेही पटविण्याचा प्रयत्न करणे नित्याचे आहे मात्र नियम मोडणाऱ्या चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी पनवेल शहरातील प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत महिला पोलीस तैनात करण्यात आल्या होत्या. या मोहिमेअंतर्गत वाहतुकीचे नियम समजावून माहिती चालकांना देण्यात आली.क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष रुपालीताई शिंदे यांनी राखी पौर्णिमेचे औचित्य साधत अशा प्रकारे नियम मोडणाऱ्या चालकांना कोणतीही शिक्षा न करता, दंडाची पावती न फाडता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अशा चालकांना चक्क राखी बांधून त्यांना वाहतुकीचे नियम 'वेगळ्याच प्रकारे' 'समजावून' सांगितले.
आम्ही फाउंडेशनच्या सर्व महिला राखी बांधून त्यांना त्यांच्या बहिणींची कमी पूर्ण करतो अश्या पद्धतीने या उपक्रमाचे स्वरूप असते, ह्या वेळी वाहतूक पोलीस निरीक्षक श्री संजय पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व पुरुष पोलीस शिपाई क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष सौ. रूपालीताई शिंदे,*वाहनचालकांना सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे सांगून रक्षाबंधन हा साजरा करण्यात आला.