आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा हा विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणांना वाव देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम

आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा हा विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणांना वाव देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम 



पनवेल(प्रतिनिधी)आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा हा विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी, भाषणकौशल्य वाढवण्यासाठी आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी सुरू केलेला महत्त्वपूर्ण उपक्रम यंदा अधिक जोमात पार पडत आहे.

पहिल्या टप्प्यातील "वर्ग अंतर्गत फेरी" त पनवेल परिसरातील ४०५ वर्गांमधून तब्बल १६,८८७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यापैकी ५५८१ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली,तत्काळ बक्षिसे मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला असून, अशा प्रकारच्या प्रोत्साहनामुळे मुलांची स्पर्धेत सहभागी होण्याची प्रेरणा दुणावली आहे. २०२५ विद्यार्थी "शाळा अंतर्गत फेरी"साठी पात्र ठरले. दुसऱ्या टप्प्यातील शाळा अंतर्गत फेरी सध्या सुरू असून प्रत्येक इयत्तेतून ३ विद्यार्थी आंतरशालेय फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

फायनलिस्टचा तपशील (आंतरशालेय फेरीसाठी पात्र):

खाजगी शाळा – ३०९ विद्यार्थी

पनवेल महानगरपालिका शाळा – ३८० विद्यार्थी

रायगड जिल्हा परिषद शाळा – १५५ विद्यार्थी

सहभागी शाळांची यादी :

लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल, कामोठे

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे 

लोकनेते डी. बा. पाटील विद्यालय, कामोठे

सी. के. ठाकूर विद्यालय, न्यू पनवेल

के. ई. एस. बार्न्स स्कूल, पनवेल

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळा, उलवे

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरबी

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खारघर

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोपरा

पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक ०१, ०२, ०४, ०५, ०६, ०८, ०९, १०, ११

सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळंबोली

सुषमा पाटील विद्यालय, कामोठे

विद्यार्थ्यांनी "माझं स्वप्न", "शिक्षणाचं महत्त्व", "इंटरनेट – वरदान की शाप?", "प्लास्टिक मुक्त भारत", "मोबाईल नसते तर?", "जर मी जादूगार असतो" अशा विविध विषयांवर उत्कटतेने भाषण केले.आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व कोशिश फाउंडेशनच्या पुढाकारातून राबवली जाणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.

कोशिश फाउंडेशनचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख मयुरेश नेतकर यांनी सांगितले की, "वक्तृत्व स्पर्धेमुळे मुलांमध्ये संवादकौशल्य आणि विचार मांडण्याची क्षमता वाढते, अध्यक्ष परेशशेठ ठाकूर यांच्या विशेष सुचनेनुसार देण्यात येणाऱ्या आकर्षक उत्तेजनार्थ बक्षिसांमुळे मुलांना प्रोत्साहन भेटते.