पनवेल महापालिकेच्या शाळांमध्ये लोकमान्य टिळकांच्या जयंती निमित्ताने बालसभेचे आयोजन


पनवेल महापालिकेच्या शाळांमध्ये लोकमान्य टिळकांच्या जयंती निमित्ताने बालसभेचे आयोजन



पनवेल दि.२३: महानगरपालिका आयुक्त श्री.मंगेश चितळे  यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात.आज बुधवार दिनांक  23 जुलै रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांच्या 169 व्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेतील सर्व शाळांमध्ये बालसभेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने पनवेल महानगरपालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार शालेय स्तरावर बालसभेंतर्गत वक्तृत्व  स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले. 

यावेळी सर्व शाळांमध्ये लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी बालसभेंतर्गत वक्तृत्व  स्पर्धेंमधून लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा परिचय आपल्या भाषणांमधून करून दिला.याबरोबरच शिक्षकांनी देखील लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान व समाजकार्य कथारूपाने सांगितले. बालसभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यास मदत झाली.