खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल मधील डॅाक्टरांच्या प्रयत्नांना यश

 *नवी मुंबईत पहिल्यांदाच मायक्रोपेनिसची समस्या असलेल्या २६ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार* 


 खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल मधील डॅाक्टरांच्या प्रयत्नांना यश 


 *नवी मुंबई:* मायक्रोपेनिस ही एक दुर्मिळ जन्मजात स्थिती आहे जी सुमारे २% पुरुषांना प्रभावित करते, जी अंदाजे १०,००,००० पैकी १ मध्ये दिसून येते. हार्मोनल किंवा विकासात्मक समस्यांमुळे, लिंग सामान्य आकारात वाढू शकत नाही, त्याची ताठरता लांबी ३ इंचांपेक्षा कमी असते. नवी मुंबईतील अशाच एका प्रकरणात *मेडिकव्हर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट डॉ. सनीश श्रृंगारपुरे तसेच प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ. आशिष सांगवीकर यांच्या नेतृत्वाखाली  टिमने मायक्रोपेनिस हा जन्मजात आजार असलेल्या २६ वर्षीय पुरूषावर लिंगाची लांबी वाढविण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.* 

रुग्णाची टेस्टोस्टेरॉनची पातळी खूप कमी होती (१२० एनजी/डीएल) तसेच लहान, अविकसित वृषण आणि उच्च एफएसएच आणि एलएच पातळी होती, जी हार्मोनल असंतुलन आणि वंध्यत्वास कारणीभूत ठरते. त्याला योनीमार्गात प्रवेश करण्यासाठी आणि परिपूर्ण वैवाहिक जीवन जगण्यासाठी लिंगांची लांबी सामान्य हवी होती. मेडिकव्हर येथील डॉक्टरांनी सस्पेन्सरी लिगामेंट रिलीज, व्ही-वाय अॅडव्हान्समेंट प्लास्टी आणि सुप्राप्युबिक लिपोसक्शनचे संयोजन केले. दोन तासांच्या प्रक्रियेच्या अंती रुग्णाच्या लिंगाची लांबी ६ इंचापर्यत वाढविण्यात यश मिळाले, जी एक उल्लेखनीय शस्त्रक्रिया होती.

 *अलिबागचा येथे राहणारे श्री नितीन कुमार (नाव बदलले आहे)*,* यांना जन्मजात सूक्ष्म शिश्न आणि अविकसित वृषणाची समस्या होती आणि यामुळे त्यांचा आत्मविश्वास खालावला होता.पण प्रेम करण्याची, प्रेम मिळवण्याची आणि कधीतरी वडील होण्याची त्याची खोलवर रुजलेली इच्छेमुळे त्याने अखेर वैद्यकिय मदत घेण्याचे ठरविले. आणि त्या धाडसाने, त्याने आपली ओळख आणि प्रतिष्ठा परत मिळवण्याच्या दिशेने पाऊल उचलले. त्याने नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमधील कुशल डॉक्टरांच्या टीमचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला  जगण्याची नवीन आशा मिळवून दिली.

 *डॉ. सनिश श्रृंगारपुरे, युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट, सांगतात की,* हे प्रकरण वैद्यकीय आणि भावनिकदृष्ट्या आव्हानत्मक होते. रुग्णाला २.५ इंचाचा मायक्रोपेनिस होता, जो हार्मोनल आणि विकासात्मक समस्यांशी संबंधीत असतो. आम्ही रुग्णाची अनुवांशिक चाचणी आणि हार्मोनल प्रोफाइल तपासली.

 *डॉ. सनीश श्रृंगारपुरे पुढे सांगतात की,* सुरुवातीला लिंगाच्या लांबीवर लक्ष केंद्रित करणे हा आमचा मुख्य उद्देश होता. आम्ही सस्पेन्सरी लिगामेंट सोडले, ज्यामुळे लिंग बाहेर काढण्यास मदत झाली, त्याजागेवरील त्वचा वाढविण्यासाठी व्ही-वाय प्लास्टी जोडली आणि प्रभावी लांबी वाढविण्यासाठी सुप्राप्युबिक लिपोसक्शन केले. परिणामी ६ इंच लांबीची ताठरता प्राप्त झाली जी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त होती. ही प्रक्रिया सुमारे ३ तास चालली. शस्त्रक्रियेनंतर ४ दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले. या प्रक्रियांबद्दल समाजात अजूनही जागरूकतेचा अभाव आहे. मायक्रोपेनिस ही जन्मजात स्थिती आहे, परंतु शस्त्रक्रियेद्वारे, योनीमार्गात प्रवेश करण्यासाठी आणि समाधानकारक संभोगासाठी पुरेशी लिंगाची लांबी प्रदान करणे शक्य आहे. उपलब्ध उपचारांमुळे रल्सू  मायक्रोपेनिस असलेले पुरुषांबरोबरच लिंगाचा आकार सामान्य असलेले पुरुषांकडून देखील या प्रक्रियेविषयी माहिती करुन घेतली जात आहे.

जर लहानपणीच या आजाराचे निदान झाले तर हार्मोनल थेरपीद्वारे लिंगाची लांबी सुधारणे शक्य होते. परंतु बहुतेक रुग्ण हे प्रौढावस्थेतच उपचारासाठी येतात त्यामुळे या वयात शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उपलब्ध असतो. लिंगाची लांबी सुधारण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. लिंगाच्या लांबीमध्ये जास्तीत जास्त वाढ साध्य करण्यासाठी सर्जन वेगवेगळ्या प्रक्रियांचा एकत्रितरित्या वापर करतात. शस्त्रक्रियेनंतर मात्र हे रुग्ण समाधानकारक लैंगिक जीवन जगु शकतात, *अशी प्रतिक्रिया प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ. आशिष सांगवीकर यांनी व्यक्त केली.* 

वर्षानुवर्षे, मी ही वेदना शांतपणे सहन केले, मी याबद्दल कोणाशीही जास्त बोलू शकत नव्हतो, अगदी माझ्या पालकांशीही मला यावर चर्चा करता येत नव्हती. दिवसेंदिवस माझा आत्मविश्वास खालावत चालला होता. मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन व अचुक उपचारांनी मला जगण्याची नवी आशा मिळवून दिली अशी प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.

मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अत्याधुनिक उपचार पध्दती व उपकरणं उपलब्ध आहेत. याठिकाणी असलेली तज्ञ डॉक्टरांची टीम, निदानाची प्रगत साधनं आणि चोवीस तास क्रिटिकल केअर सपोर्टच्या माध्यमातून उत्तमोत्तम रुग्णसेवा पुरविण्याचा आम्ही पुरेपुर प्रयत्न करतो  *अशी प्रतिक्रिया मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी व्यक्त केली.*