एन.सी.सी. विभाग आणि लायन्स क्लबच्या वतीने करंजाडे येथे वृक्षारोपण

 एन.सी.सीविभाग आणि लायन्स क्लबच्या वतीने करंजाडे येथे वृक्षारोपण

 


पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्सकॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्तचे एन.सी.सी. विभाग आणि लायन्स क्लब नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने करंजाडे ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेयासमयी करंजाडे ग्रामपंचायतचे सदस्य व स्वयंसेवक आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.  

महाविद्यालयातील एकूण ६० कॅडेट्सचा सभाग होता.  कार्यक्रमदिनी महाविद्यालयाच्या एन.सी.सी.  विभागाचे कॅडेट्स तथा एन.सी.सी. अधिकाऱ्यांच्या चमुने सकाळी ०९.३० वाजता उपक्रमस्थळाकरीता महाविद्यालयातुन प्रस्थान केलेसदर चमूचे करंजाडे ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यामार्फत स्वागत करण्यात आले.  मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आलेयासोबतच उपस्थित विद्यार्थी आणि एन.सी.सी. अधिकारी यांनी वेगवेगळ्या प्रकाराच्या एकूण १५० रोपांची लागवड करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलायावेळी करंजाडे ग्रामपंचायतचे यांचे विशेष सहकार्य लाभलेवृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.बी.डी.आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी.विभागाच्या  ए.एन.ओ. लेफ्टनंट प्रा. निलीमा तिदारसी.टी.ओ. प्रा. एस.एस. व्यवहारे, सी.टी.ओ. डॉ. जे. एम. पावरा यांनी विशेष परिश्रम घेतले.


Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image