वाढदिवसाला शुभेच्छांचे बॅनर, जाहिरात नको त्या ऐवजी सामाजिक उपक्रम राबवा - आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन

वाढदिवसाला शुभेच्छांचे बॅनर, जाहिरात नको त्या ऐवजी सामाजिक उपक्रम राबवा - आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन


पनवेल (प्रतिनिधी) वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज लावू नये तसेच वर्तमानपत्र प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिरात देऊ नये, त्या ऐवजी सामाजिक उपक्रम आयोजित करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले आहे.
       आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आवाहनात पुढे सांगितले कि, दिनांक ०५ ऑगस्ट रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक भरभरून शुभेच्छा देत असतात आणि या शुभेच्छांमुळे मला चांगली आणि अधिक कामे करण्याची सातत्याने प्रेरणा मिळत असते. आपले नेते महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा होडींग्ज लावू नये तसेच वर्तमानपत्रात जाहिरात देऊ नका, त्यापेक्षा तो खर्च सामाजिक कार्यासाठी करा, असे आवाहन केले. त्या अनुषंगाने मी सुद्धा आपल्या नेत्याचे अनुकरण करत त्याच धर्तीवर मी सर्वाना आवाहन करीत आहे कि, माझ्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रात जाहिरात, बॅनर, होर्डिंग्ज यावर खर्च करू नका, त्यापेक्षा हा खर्च सामाजिक कार्यात करावा. आणि त्या अनुषंगाने आपल्यावर असलेले प्रेम सामाजिक कार्यातून व्यक्त करावे, असेही त्यांनी आपल्या आवाहनातून अधोरेखित केले.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image