नमुंमपा अतिक्रमण विभागामार्फत बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर कारवाई
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
1) श्री./ श्रीम. सुरेश धर्मा कोळी व बाळकृष्ण धर्मा कोळी, घर नं. 1344, सेक्टर - 14, दिवाळे गांव, नवी मुंबई, 2) श्री./ श्रीम. अशोक कोळी व इतर घर नं. 1353, सेक्टर - 14, दिवाळे गांव, नवी मुंबई यांचे अनधिकृत बांधकामास अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत MRTP कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. त्याअनुषंगाने संबधितांनी अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामावर अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन सदर अनधिकृत बांधकामावर निष्कासित कारवाई करण्यात आली आहे. या धडक मोहिमेसाठी अे विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, सहाय्यक अभियंता श्री. आत्माराम काळे तसेच बेलापूर विभागातील अधिकारी/ कर्मचारी, मजूर- 10, हॅमर -02, गॅसकटर-02 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.