बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी एकसंध शिक्षण प्रणाली तयार करण्यासाठी राष्ट्रीय बौद्धिक सशक्तीकरण संस्थान सिकंदराबाद आणि जय वकील फाउंडेशन यांचा ऐतिहासिक सामंजस्य करार

बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी एकसंध शिक्षण प्रणाली तयार करण्यासाठी राष्ट्रीय बौद्धिक सशक्तीकरण संस्थान सिकंदराबाद आणि जय वकील फाउंडेशन यांचा ऐतिहासिक सामंजस्य करार



मुंबई, 18 जुलै 2025 – बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी एकसंध अभ्यासक्रमाची आवश्यकता ओळखून, राष्ट्रीय बौद्धिक सशक्तीकरण संस्थान आणि जय वकील फाउंडेशन (JVF) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. हा करार जय वकील स्कूल शिवडी मुंबई येथे गुरुवार दिनांक 18 जुलै 2025 रोजी झाला.

या कराराअंतर्गत दिशा (DISHA) अभ्यासक्रम, मल्टीसेन्सरी डिजिटल पोर्टल, वैयक्तिक शैक्षणिक अभ्यासक्रमास (IEP) साठी मूल्यांकन चेकलिस्ट, आणि शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण भारतात राबवले जाणार आहेत. हा अभ्यासक्रम CDEIC केंद्रे, DDRS प्रकल्प, तसेच स्वयंसेवी संस्थांमध्येही विनामूल्य उपलब्ध होईल.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, बौद्धिक दिव्यांग व्यक्तीसाठी सशक्तीकरण विभागाचे (DEPwD) सचिव श्री. राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत हा करार झाला. त्यांनी सांगितले की, सुलभ शिक्षण साहित्याचा विकास(Development Accessible Learning Materials) DALM योजनेअंतर्गत दिशा (DISHA) अभ्यासक्रमाचे इंग्रजी, हिंदी, मराठी व इतर भाषांतील साहित्य छापून मोफत वितरित केले जाईल. तसेच, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांना (CRE) मान्यता दिली जाईल. 

राष्ट्रीय बौद्धिक सशक्तीकरण संस्थेचे संचालक डॉ. बी. व्ही. रामकुमार यांनी सांगितले की, "जय वकील फाउंडेशनसोबत सहकार्यामुळे गुणवत्तापूर्ण व एकसंध शिक्षण देशभरातील बौद्धिक दिव्यांग मुलांपर्यंत पोहोचेल."

जय वकील फाउंडेशनच्या सी इ ओ (CEO) अर्चना चंद्रा यांनी सांगितले की, "दिशा (DISHA) अभियान महाराष्ट्रातील 450 पेक्षा अधिक विशेष शाळांमध्ये यशस्वीपणे राबवले गेले असून आता राष्ट्रीय बौद्धिक सशक्तीकरण संस्थेच्या राष्ट्रीय व्यासपीठावर ते पोहोचले आहे."

दिशा (DISHA) अभियान हा एक समग्र कार्यक्रम असून त्यामध्ये व्हि ए के टी (VAKT) (Visual-Auditory-Kinesthetic-Tactile) तंत्रज्ञान, डिजिटल वैयक्तिक शैक्षणिक अभ्यासक्रम ट्रॅकिंग, आणि शिक्षक प्रशिक्षण यांचा समावेश आहे.

हा करार एस डी जी (SDG) 4 (गुणवत्तापूर्ण शिक्षण) आणि एस डी जी (SDG) 10 (समानता वाढवणे) यांसारख्या जागतिक उद्दिष्टांशी सुसंगत असून "विकसित भारत" दृष्टिकोन साकारतो.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image