के.आं.बाठिया महाविद्यालयात गुरूंना वंदन करून गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली

के.आं.बाठिया महाविद्यालयात गुरूंना वंदन करून गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली


पनवेल/प्रतिनिधी दि.१०- महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिन म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा जी *गुरुपौर्णिमा* म्हणून ओळखली जाते महर्षी वेदव्यास यांनी घोर तपश्चर्येनंतर वेद, पुराणे, महाभारत यांची रचना केली म्हणून त्यांना आद्य गुरु म्हणून संबोधले जाते .ही गुरुपौर्णिमा के. आ.बांठिया  माध्यमिक महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी झाली. 

विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री. माळी सर, उपप्राचार्य श्री. आंब्रे सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. महाजन सर ,पर्यवेक्षक श्री. गोखले सर, पर्यवेक्षिका  वेलणकर मॅडम सांस्कृतिक प्रमुख व गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे नियोजक- सौ. पाटील टी. एस, सौ. गोखले ए.ए. ,श्रीमती शाह पी. एस .यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी दादासाहेब लिमये यांच्या मूर्तीचे पूजन,  कैलासवासी केशरचंद आनंदरामजी बांठिया यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली.

"गुरु हा संत कुळीचा राजा

गुरु हा प्राण विसावा माझा"

हे समजून घेत कुमारी प्राप्ती गावंड व कुमारी लक्ष्मी बोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

"सद्गुरुसारखा असता पाठीराखा

इतरांचा लेखा कोण करी l"

याची जाणीव ठेवून मा. माळी सर यांनी विद्यालयातील शिक्षकांचा यथोचित सत्कार केला. अरुणी आणि धौम्य ऋषी,अर्जुन एकलव्य आणि द्रोणाचार्य अशा गुरु- शिष्यांच्या उदाहरणांनी आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास उजळून गेलेला आहे .अनेक शिष्यांनी गुरुभक्तीचे आदर्श घालून दिले आहेत. आपणही हेच व्रत आचरणात ठेवणे आणि जोपासणे महत्त्वाचे आहे हे सांगणारे मौलिक मार्गदर्शन माननीय मुख्याध्यापक श्री. माळी सर यांनी केले.

प्रत्येक वर्गात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात स्वतंत्ररित्या साजरा करण्यात आला. आपल्या  गुरूंना पेन, फुले गुरुदक्षिणा म्हणून देऊन आपल्या गुरुभक्तीचे प्रेमळ उदाहरण विद्यार्थ्यांनी घालून दिले.