कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 'खेळ रंगला पैठणीचा'सह विविध भव्य कार्यक्रम संपन्न

कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 'खेळ रंगला पैठणीचा'सह  विविध भव्य कार्यक्रम संपन्न 



खारघर (प्रतिनिधी) दि.८-कोकण म्हाडाचे मा.सभापती मा. श्री. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, महिला सक्षमीकरण, मनोरंजन आणि सन्मान यांचा सुंदर संगम ठरणारा ‘न्यू होम मिनिस्टर’ हा विशेष कार्यक्रम खारघर सेक्टर-१२ येथील केंद्रीय विहार मेट्रो स्टेशनच्या खालील वाहन तळावरती संपन्न झाला.यामध्ये महिलांना मानाच्या ३ पैठण्या आणि ३ सोन्याच्या नथी बरोबरच भरघोस साड्यांची बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.

        घर आणि समाज या दोन्ही आघाड्यांवर आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाऱ्या मातृशक्तीच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गृहिणींना त्यांची नेतृत्वक्षमता, संवादकौशल्य आणि विनोदबुद्धी दाखवण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती,सुप्रसिद्ध सिने-अभिनेत्री मा.सौ.शिवानी सुर्वे(‘देवयानी’, ‘फुलवा’ मालिका आणि ‘ट्रिपल सीट’ चित्रपट फेम) आणि सुप्रसिद्ध सिने-अभिनेत्री मा.सौ.मेघा धाडे(2018: बिग बॉस मराठी विजेती) तसेच सुप्रसिद्ध सिने-अभिनेता - मा.श्री.क्रांती नाना माळेगावकर (न्यू होम मिनिस्ट्रर खेळ पैठणीचा)

      त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभली ती आमदार मा.श्री प्रशांतजी ठाकूर, प्रदेश सरचिटणीस मा.श्रीमती.माधवीताई नाईक, रायगड भाजपचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. अविनाश कोळी, नगरसेविका सौ.संजना कदम, मा.सौ.नेत्रा पाटील, मा.श्री.ब्रिजेश पटेल, मा.सौ.साधना पवार,मा.श्री.संतोष शर्मा, ऍडव्होकेट मा.नगरसेवक नरेश ठाकूर,मा.नगरसेविका सौ.हर्षदा उपाध्याय,सौ.आरती नवघरे,अमर उपाध्याय, ऍडव्होकेट सौ.संतोषी चव्हाण यांच्यासह खारघर,तळोजा, पनवेल,नवीन पनवेल,खांदा कॉलनी, कळंबोली,नावडे आणि कामोठा येथील लोकनेते बाळासाहेब पाटील यांच्यावरती प्रेम करणारे हजारो स्त्री-पुरूष, अबालवृद्ध नागरिक आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        संयोजक नगरसेवक समीर कदम मित्र परिवार, उदय पाटील मित्र परिवार, विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान तसेच सर्व सहकार्याचे मोलाचे योगदान लाभले.

     जनतेच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि सकारात्मक प्रतिसादाने कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा संचारली. महिला भगिनींनी ज्या उत्साहाने विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला, आपली कला, नेतृत्व आणि संवादकौशल्य दाखवले, ते खरंच प्रेरणादायी ठरले.

      याव्यतिरिक्त शनिवार दिनांक ०७ जून २०२५ रोजी

🔶 भव्य बास्केटबॉल स्पर्धा – सकाळी ९:०० वा. 📍पनवेल जिमखाना

🔶भव्य उद्योजक संवाद मेळावा – सकाळी १०:३० वा. 📍अतिथी बँक्वेट हॉल, कामोठे 

🔶भव्य रक्तदान शिबीर – सकाळी ११:३० वा. 📍नवीन सुधागड शाळा, कळंबोली 

🔶१० वी  व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व व्याख्यान – सकाळी ११:३० वा. 📍नवीन सुधागड शाळा, कळंबोली 

🔶रिक्षाचालकांसाठी CNG कुपन वाटप

🔶जेष्ठ नागरिकांना गरम पाण्याची पिशवी (HOT WATER BAG)वाटप

🔶गरजूना मोफत धान्य किट वाटप 

🔶नागरिकांना मोफत छत्री वाटप 

🔶आयुष्मान भारत कार्ड वाटप 

तसेच nmmt बस उद्घाटन संपन्न झाले.या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन  "युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान" यांनी केले.

       या सर्व कार्यक्रमांच्या भव्यतेसाठी आणि यशस्वीतेसाठी सन्माननीय बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र आमदार विक्रांतजी पाटील यांनी कार्यकर्त्यांनबरोबर स्वतःला झोकून दिले होते.