महाळुंगी आदीवासी वाडीतील शेकाप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
पनवेल (प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टीच्याा माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना तसेच सक्षम नेतृत्वावर प्रभावीत होऊन महाळुंगी आदीवासी वाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वगात करुन त्यांनी जो विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश केला आहे तो सार्थ ठरेल असा विश्वास दिला.
पनवेल विधानसभा मतदार संघातील महाळुंगी आदीवासीवाडीतील शेकापचे राम नाईक, लुहु वाघे, वाळु वाघे, राजेश वाघे, नरेश नाईक, राकेश नाईक, विनोद वाघे, सुनिता वाघे, अंजना वाघे, प्रकाश वाघे, लक्ष्मी वाघे, नितेश वाघे, सुनिता वाघे, महेश वाघे, शारदा वाघे, द्रुपदा वाघे, शुभांगी वाघे, सुमन वाघे, कविता वाघे, मुक्ता नाईक, चंद्रा नाईक, शानुबाई गोंधळी, राजेश वाघे, हितेश नाईक, ज्ञानेश्वर नाईक यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. हा पक्ष प्रवेश सोहळा पनवेल शहरातील भाजपच्या कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, विभागीय अध्यक्ष सुनिल पाटील, प्रमोद भगत, द्वाराकानाथ बोलाडे, रघुनाथ पाटील, शशिकांत दिसले, सरपंच चंदाताई वारदे, योगेश पाटील, सचिन दिसले, प्रशांत बोलाडे, आत्माराम पाटील, उमेश वारदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.