पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; आंतरराष्ट्रीय योग दिनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद


पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; आंतरराष्ट्रीय योग दिनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद





पनवेल,दि.21: आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने वडाळे तलावाजवळ भव्य स्वरूपात ‘योग दिवस’ साजरा करण्यात आला. पंतजली योग समितीचे, भारतीय नौसेनेचे निवृत्त लेफ्टनंट पतंजली योग समितीचे मुख्य प्रशिक्षक राम पलट यादव यांनी यावेळी उपस्थितांना योगासने व प्राणायम, ध्यान याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील,  अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते,  उपायुक्त मंगला माळवे, नगर रचनाकार राजेश कर्डिले,  घनकचरा व स्वच्छता विभागप्रुख अनिल कोकरे , जिल्हा  प्रभारी पतंजलि किसान सेवा समिति, पनवेल विभाग सर्वश्री  रविंद्र मोरे, संजय कुमार सिंह ,  विविध सामाजिक जिल्हा प्रभारी पतंजलि पतंजलि युवा भारत, पनवेल विभाग विकास सूर्यभान देशमुख,  पण्डित श्री रामकेश शर्मा ,प्रमिला शशि कुमार शेट्टी ,पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये योगाला प्रचंड महत्व होते. योगामुळे शरीर,मन दोन्हीही सुदृढ बनते. केवळ भारत देशच नाहितर साऱ्या जगाला आता योगाचे महत्व पटले आहे. योगाभ्यासाच्या जनजागृतीसाठी  21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. पनवेल महानगरपालिकेच्यावतीने साजरा करण्यात आलेल्या या योग दिनाच्या कार्यक्रमाला पावसाळी वातावरण असून देखील सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी पंतजली योग समितीचे राम पलट यादव यांनी , ताडासन, वक्रासन, भुजंगासन, त्रिकोणासन  असे आसानाचे विविध प्रकार शिकवून त्याचे फायदे सांगितले. तसेच प्राणायमामध्ये कपालभाती, भ्रामरी, अनुलोम विलोम याबद्दल मार्गर्शन केले. याबरोबरच ध्यान करण्यास सांगून त्याचा शरीराला होणारा लाभ याबाबत सविस्तर माहिती दिली.


चौकट

योग दिनाचे औचित्य साधून स्वच्छ, सुंदर व सदृढ पनवेल बनविण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ खारघर येथे योग दिवस आणि वृक्षारोपण  कार्यक्रम राबवण्यात आला. तसेच योग दिनानिमित्त रॅली काढण्यात आली.