राजर्षि शाहू महाराज जयंती निमित्ताने पनवेल महापालिका मुख्यालयात अभिवादन
पनवेल,दि.26: पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज ( 26जून) सामाजिक समतेची शिकवण देणारे , लोकनेते राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे ,परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त मंगला माळवे,मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखाधिकारी संग्राम ऱ्होरकाटे, सचिव अक्षय कदम ,लेखा परिक्षक संदिप खुरपे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख किर्ती महाजन, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी व पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.