लोकशाही भक्कम करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया : आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल,दि.25 : लोकशाही भक्कम करण्यासाठी आपण एकत्र येऊया, लोकशाही जागृत ठेवण्याच्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करत राहूया, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आणीबाणी कालावधीत लोकशाहीचा लढा व बंदिवास भोगावा लागलेल्या मान्यवरांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 25 जुन रोजी आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये करण्यातआले यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले,आणीबाणीच्या काळात लोकशाही पुर्नप्रस्थापित करण्यासाठी , त्यावेळी जे अन्याय अत्याचार सुरू होते, ते थांबविण्यासाठी ज्यांनी सक्रिय भूमिका बजावली अशा मान्यवरांच्या कर्तृत्वाचा अभिमान पनवेलकरांना आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
या कार्यक्रमास महापालिका कार्यक्षेत्रातील आणीबाणी कालावधीत लोकशाहीच्या लढ्यांमध्ये बंदिवास भोगावा लागलेले 7 मान्यवर,आमदार प्रशांत ठाकूर, मनपा आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे ,उपायुक्त सर्वश्री डॉ.वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, स्वरूप खारगे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, लेखा परिक्षक निलेश नलावडे,शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त सर्वश्री श्रीराम पवार, डॉ. रूपाली माने, सुबोध ठाणेकर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, गणेश कडू, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव, महापालिका अधिकारी व नागरिक या कार्यक्रमांस उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी केले. मनपातर्फे या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले.
या कार्यक्रमात पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चौकट
आणीबाणी दरम्यान बंदिवास भोगलेल्या श्रीमती सरिता प्रभाकर गांधी या आजारी असल्याकारणाने त्या या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत त्यांना महापालिकेच्यावतीने त्यांच्या घरी जाऊन सन्मानीत करण्यात आले.
चौकट
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 'आणीबाणी विशेष स्मरण प्रदर्शन' 2 जुलैपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये स्वाक्षरी मोहिम राबविण्यासाठी खास बोर्डची सोय करण्यात आली आहे. या बोर्डवर आलेल्या मान्यवरांनी तसेच महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केली.
......