महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस गुणवंतांच्या साक्षीने उत्साहात साजरा.;मान्यवरांच्या हस्ते `सुखकर्ता’ विशेष अंकांचे प्रकाशन

महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस गुणवंतांच्या साक्षीने उत्साहात साजरा.;मान्यवरांच्या हस्ते `सुखकर्ता’ विशेष अंकांचे प्रकाशन






उरण दि २(विठ्ठल ममताबादे )आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा ५८ वा वाढदिवस गुणवंतांच्या साक्षीने व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्या जीवनकार्यावर आधारित `सुखकर्ता’ हा छोटेखानी विशेषांक प्रकाशित करण्यात आला.
यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील हजारो मान्यवर महेंद्रशेठ घरत यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
यावेळी नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत, दिबांचे पुत्र अतुल पाटील, पनवेल महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश ठाकूर, ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी,उद्योजक राम म्हात्रे,  उद्योजक सुनील म्हसकर, डॉ. दिपाली गोडघाटे, ॲड. रेखा चिरनेरकर, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे, तसेच एम. जी. ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांचा सपत्निक सत्कार केला.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image