ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावात राज्यस्तरीय एकेरी नूत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
उरण दि १(विठ्ठल ममताबादे )ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावातील नूत्य स्टार कलाकार आर्या नारंगीकर हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीराम सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आणि महागणपती ४०+मास्टर चिरनेर यांनी राज्यस्तरीय एकेरी नूत्य स्पर्धा - २०२५ चे आयोजन शनिवारी ( दि३१) केले होते.या नूत्य स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेतील नूत्य कलावंतांना चिरनेर परिसरातील रहिवाशांनी, श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन दिले.
या एकेरी नूत्य स्पर्धेतील मोठा गटामध्ये लातूर येथील अभि घोडके यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्याला रोक रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.द्वितीय क्रमांक हर्ष पवार,प्रतिक सैदाणे,तुतीय क्रमांक संदिनी भिडे, रोहित पांडे तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रदिप गुप्ता,पूर्ण मिस्त्री ,कुम कुम यांना देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.तर लहान गटा मध्ये प्रथम क्रमांक पूर्वा झावरे, द्वितीय क्रमांक क्रुपा नागपूरे,आरोही पाटील,तूतीय क्रमांक दिशा परब,परी नक्का जालना,तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून मुग्धा उभारे,पूजा कापूरे,दुष्टी ठाकूर यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम सन्मान चिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
या स्पर्धेचे औचित्य साधून आयोजकांकडून
चिरनेर जीवन गौरव पुरस्कार म्हणून चिरनेर गावातील कुषी अधिकारी कुमारी हिमानी काशिनाथ मोकल, वारकरी संप्रदायाचे प्रमुख ह.भ.प.दत्तात्रेय मोकल व त्यांचे सहकारी मित्र, शेतीनिष्ठ शेतकरी प्रफुल्ल खारपाटील, क्रिकेट क्षेत्र राजू संभाजी चिर्लेकर, वैद्यकीय सामाजिक क्षेत्र समिर डुंगीकर, जयवंत ठाकूर सर्प मित्र, जेष्ठ पत्रकार दत्तात्रेय म्हात्रे, सैनिक सचिन कडू यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिरनेर गावचे सरपंच भास्कर मोकल, भाजपचे युवा नेते प्रतिक गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते संतोष म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मनोज भगत, भालचंद्र मोकल, अर्जुन मोकल, ग्रामपंचायत सदस्या अस्मिता अनंत नारंगीकर, नंदकुमार चिरनेरकर, निकिता नितीन नारंगीकर,दिपक सर, पप्पू सुर्य राव, नरेश नारंगीकर, जितेंद्र नारंगी कर, प्रशांत खार पाटील, रवींद्र भगत, नितीन नारंगी कर, राजेंद्र भगत सह इतर मान्यवर उपस्थित होते.