पनवेल महापालिकेच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन


पनवेल महापालिकेच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन

“प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन” विषयावर जनजागृतीसाठी महापालिकेच्यावतीने सायकल रॅली





पनवेल दि.१:

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल महानगरपालिका आणि विविध सायकलिंग संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली “प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मूलनाचे महत्त्व” या विषयावर जनजागृती करण्यासाठी आज दिनांक १जून रोजी सकाळी सायक्लोथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले.

उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या सुचनेनुसार घेण्यात आलेल्या या रॅलीला महापालिका सहायक आयुक्त श्रीराम पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरूवात करण्यात आली.भारत पेट्रोल पंप (ओरियन मॉल जवळ) येथून सुरू होऊन एचडीएफसी सर्कल – आयडीएफसी सर्कल मार्गे पुन्हा वडाळे तलाव येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.

नामवंत सायकलिंग क्लब्स आणि पर्यावरणप्रेमींनी या सायकल रॅली मध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये पनवेल बायसिकल ग्रुपचे मेयर सुधीर चाकोळे, पूरनसिंग मेहरा, आणि जानेट लॉरेन्स बर्नार्ड (रनथॉन सायक्लिंग क्लब) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे १०० पर्यावरणप्रेमी सायकलस्वारांनी यात सहभाग नोंदविला.

यावर्षी युएनईपी (United Nations Environment Programme) यांनी “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन” (Ending Plastic Pollution Globally) ही  थीम घोषित केलेली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २२ मे ते ५ जून या कालावधीत देशभर जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश दिले आहेत.यास अनुसरून महापालिकेच्यावतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित केलेल्या या सायकल रॅलीमध्ये  प्लास्टिक प्रदूषणाचे तोटे,प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाय योजना बाबत संदेश देण्यात आला.

चौकट 
रॅलीत सहभागी झालेल्या प्रमुख सायकलिंग संघटना :
रनथॉन सायक्लिंग क्लब
फिट इंडिया संडे सायक्लिंग
बीवायसीएस (BYCS)
पनवेल सायक्लिंग क्लब
डेकाथलॉन सायक्लिंग क्लब
टीम केकेसीसी (KKCC)
पनवेल रायडर्स