पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केली नालेसफाईची पाहणी, लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना
पनवेल,दि.23: यावर्षी भरपूर पाऊसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवरती मान्सुनपूर्व पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागातील विविध नाल्यांच्या सफाईची पाहणी करून नुकताच कामकाजाचा आढावा आयुक्त तथा प्रशसक मंगेश चितळे यांनी घेतला. यावेळी स्वच्छता व घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते , शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेच्या ११० किलोमीटर क्षेत्रात १०१मोठे आणि २,१०४ छोटे नाले असून या महापालिका क्षेत्रात एकूण मोठे नाल्यांची संख्या ९७ इतकी आहे. यापैकी ६८ नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. तर २,१०४ इतक्या छोट्या नाल्यांपैकी १ हजार २६२ नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस पण लवकर आल्याने नाले सफाईची सर्व कामे वेगाने पूर्ण होण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी या नाले सफाई पहाणी केली. या पहाणी दरम्यान खारघर मधील सेक्टर 12, महापौर बंगला जवळील नाले, उत्सव चौक, कळंबोली पंप हाऊस, कळंबोली चर्च जवळील नाला अशा सर्व नाल्यांची पहाणी आयुक्तांनी केली.
*आयुक्तांनी दिल्या सूचना*
कळंबोली शहरात पालिकेचे विशेष लक्ष असून आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. या पहाणीवेळी आयुक्तांनी नाल्यातील काढलेला गाळाची योग्यरित्या विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे सांगून , उर्वरीत नालेसफाईची कामे वेगाने करण्याच्या सुचना संबधित विभागास दिल्या.
चौकट
यांत्रिक पध्दतीने नालेसफाई
आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी नालेसफाईचे सूक्ष्म नियोजन केले आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून यांत्रिक पध्दतीने चारही प्रभागातील नालेसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले आले असून, नालेसफाईबरोबरच शहरातील छोट्या-मोठ्या गटारीच्या साफसफाईचे कामही जोमाने सुरू आहे. सध्या नालेसफाईची कामे युध्द पातळीवर सुरू असून या कामासाठी सरासरी 700मनुष्यबळ, १५ जेसीबी, 15 पोखलँड, 17 डम्पर वापरण्यात येत आहे. नालेसफाई कामामध्ये उचलण्यात आलेला गाळामध्ये मोठ्या प्रमाणात माती असल्याने पनवेल महानगरपालिका हद्दीतच मोकळ्या भूखंडावर पसरण्यात येत आहे.