अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर

 

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर




पनवेल (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजसुधारकाची भूमिका बजावत अनेक पातळ्यांवर काम केले. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खांदा कॉलनीमध्ये भाजप नवीन पनवेल मंडळाच्या वतीने आयोजित स्वच्छता अभियानावेळी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भाजपने २१ ते ३१ मे या कालावधीत ’सामाजिक पर्व’ म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत, रविवारी खांदा कॉलनीमधील महादेव मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
         या अभियानात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेत पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या प्रजेसमोर अनेक आदर्श निर्माण केले होते. त्यांचे कार्य पुढच्या पिढीला समजावे आणि त्यांच्या कार्याची माहिती तरुणाईला व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांचे कार्य अधिकाधिक तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. या स्वच्छता अभियानात भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, गणेश पाटील, 
जगदीश घरत, शशिकांत शेळके, कामगार नेते मोतीराम कोळी, गोपीनाथ मुंडे, आनंदी ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील, भीमराव पोवार, संजय कांबळे, प्रभाग अध्यक्ष शांताराम महाडिक, विजय म्हात्रे, आशा मुंडे, स्वाती नांगरे, मयूर कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते