लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी स्पर्धा
पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि योनेक्स सनराइज् यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स च्या विस्तीर्ण कोर्टवर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उदघाटन बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभाग्रुहनेते नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले.
या स्पर्धेत ९, ११, १३, १५, १७ आणि १९ या वयोगटातील एकेरी तसेच दुहेरी विविध श्रेणीमध्ये स्पर्धा आयोजित केलेली आहे. तसेच २१ वर्षाखालील मुला मुलींसाठी एकेरी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. यावेळी बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड चे उपाध्यक्ष रवींद्र भगत, खजिनदार नरेंद्र जोशी, शिवा कराईल, प्रणित गोंधळी, योगेश पाटील, शामनाथ पुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तीन लाखाहून अधिक रकमेची रोख पारितोषिके असलेल्या या स्पर्धेमध्ये २०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.या स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत २ जून रोजी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे.