अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांचा कासाडी नदी पुनरूज्जीवन प्रकल्प पाहणी दौरा

अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांचा कासाडी नदी पुनरूज्जीवन प्रकल्प पाहणी दौरा

पनवेल,दि.14: पनवेल महानगरपालिकेमार्फत तळोजा औद्योगिक परिसर आणि गावांना जोडणाऱ्या कासाडी नदीच्या संवर्धनासाठी ‘कासाडी नदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष पाहणी दौरा’ आज बुधवार दिनांक. 14 मे रोजी आयुक्त तथा मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी केला.

 सदर पाहणी दौऱ्यांवेळी महापालिका उपायुक्त स्वरूप खारगे, शहर अभियंता संजय कटेकर, उप अभियंता विलास चव्हाण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ.विक्रांत भालेराव, जलसंपदा उप अभियंता अमित पारळे, सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ अभियंता मेंगाळ, एमआयडीसी प्रतिनिधी दिलीप बोबडे-पाटील, माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा औद्योगिक परिसर आणि गावांना जोडणाऱ्या कासाडी नदीच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेने पाऊले उचलेली आहेत. त्यानुषंगाने आयुक्त चितळे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कासाडी नदीच्या संवर्धनासाठी योग्य ती उपाययोजना करण्याकरिता नियोजनाची जबाबदारी महापालिकेस देण्यात आली आहे, या अनुषंगाने लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती.

 कासाडी नदी संवर्धनासाठी रायगड जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या आहेत. या पत्रानूसार कासाडी नदी पुनरूज्जीवीत करण्यासाठी विविध आस्थापनांसोबत आज पाहणी दौरा आयोजित करून प्रत्यक्ष नदी पात्राची पाहणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी सदर नदी पुनरूज्जीवीत करण्यासाठी संयुक्तपणे कार्यवाही करताना संबंधित आस्थापनांना विविध निर्देश दिले. 

पनवेल महानगरपालिका हद्दीमधील प्रदूषित कासाडी नदीचे पुनरूज्जीवन करण्याच्या उद्देशाने विविध कंपन्यांकडून नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर देखरेख करून त्याच स्क्रीनींग करण्याविषयीचे निर्देश संबधित आस्थापनाना देण्यात आले. 

 गणेश घाट, तोंडरे येथील नदी पात्रात अनधिकृतरित्या कंपनीद्वारे, टँकरने केमिकलयुक्त पाणी, सांडपाणी सोडले जाते. अशा कंपन्या , टँकरवर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळास सूचित करण्यात आले. 

गणेश घाट, तोंडरे येथील नदी पात्रात ‘स्मॉल चेन ऑफ बंधारे’ बांधणेबाबत नियोजन करणे, काप्रेचार्य मंदिर, नावडे येथे भरतीच्या वेळी नदीचे पाणी गावामध्ये घुसू नये यासाठी गॅबियन वॉल बांधणेबाबत नियोजन करण्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अतिीरीक्त आयुक्तांनी निर्देश दिले. 

कासाडी नदीच्या पूर रेषेबाबत महानगरपालिकेस माहितीस्तव पत्र देणे व सदर नदीचा मूळ प्रवाह उन्हाळ्यात देखील प्रवाहीत राहील या दृष्टीने नदीमधील अडथळे काढून टाकण्याबाबत,तसंच

कासार्डी नदीतील केमिकलयुक्त पाणी सी.ई.टी.पी. ला ट्रान्सफर करून त्यावर प्रक्रिया करणेस्तव नियोजन करणे, एम.आय.डी.सी. हद्दीतील रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात येणाऱ्या टँकरवर कारवाई करण्याबाबत एमआयडीसी आस्थापनांना अतिरीक्त आयुक्तांनी निर्देश दिले. 

गणेश घाट, तोंडरे येथील नदी पात्रात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत जलसंपदा विभागास सूचित करण्यात आले.तरकासार्डी नदी पात्रात अनधिकृतरित्या कंपनी , टँकरद्वारे केमिकलयुक्त पाणी ,सांडपाणी सोडले जाऊ नये यास्तव ठिकठिकाणी सोलार बेस सी.सी.टी.व्ही कॅमेरे ‍लावण्याबाबत श्री.शेटे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास निर्देश दिले.

     कासाडी नदीचे पुनरूज्जीवन करण्याच्या उद्देशाने विविध आस्थापनांच्या झालेल्या संयुक्त दौऱ्यामध्ये कासार्डी नदी संवर्धनाबाबत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करून संबंधितांना उचित कार्यवाही विहीत मुदतीत करण्याचे आदेश महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री. गणेश शेटे यांनी देऊन दौऱ्याची सांगता करण्यात आली.

      या वेळी पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, टी. आय. ए. सतिश शेट्टी, सुनिल पडलानी, प्रभाग अधिक्षक जितेंद्र मढवी, सहाय्यक अभियंता औदुंबर अलाट, सहाय्यक अभियंता एच.एन. सरग, सहाय्यक अभियंता निवृत्ती चंदेवाड उपस्थित होते.

. .........