अविनाश कोळी यांची भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुनर्निवड
पनवेल(प्रतिनिधी) संघटन कौशल्य, कार्यक्षमता व पक्षशिस्त म्हणून ओळखले जाणारे अविनाश कोळी यांची भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली आहे. प्रदेश भाजपच्यावतीने आज राज्यातील जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली असून पुढील वाटचालकरीता शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या पुनर्नियुक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही निवड अत्यंत फलदायी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.