इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटीचा हॅप्पी स्कूल उपक्रम .... शैक्षणिक मदतीने नानोशी शाळेचे रंगरूप बदलले
पनवेल(प्रतिनिधी) इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटीच्यावतीने रायगड जिल्ह्यातील नानोसी येथील आदिवासी गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत हॅपी स्कूल उपक्रम स्वनिधीतून राबविण्यात आला.क्लबमधील जवळजवळ ३५-४० सदस्यांनी मिळून एक लाखांपेक्षा जास्त निधी जमा करून शाळेच्या वर्गाला आतून-बाहेरून अतिशय सुंदर असे शैक्षणिक पेंटिंगचे काम करून देण्यात आले तसेच शाळेची सुरक्षा भिंत व पाण्याच्या टाकीलाही सुंदर अशा चित्रांच्या सहाय्याने रंगविण्यात आले,इतकेच नाही तर वर्गात पुस्तके ठेवण्यासाठी कपाट,खुर्च्या, टेबल,मुलांना बसण्यासाठीचे बेंचेस,चप्पल स्टँड,खेळाचे साहित्य व मुलांना गणवेश इ.साहित्यदेखील या संस्थेमार्फत देण्यात आले.अतिशय कमी वेळात अध्यक्षा सौ.प्रतिभा डांगी व माजी अध्यक्षा सौ.ध्वनी तन्ना यांनी प्रयत्न करून शाळेच्या मुख्य शिक्षिका सोनल गावंड यांच्या मदतीने शाळेचे रंगरूप बदलून टाकले .
याकामी अर्चना परेश ठाकूर यांनी तसेच त्यांच्या वीर वुमेन्स फाउंडेशन या संस्थेने तसेच अरिहंत पेन्टस् पनवेल यांनी देखील आर्थिक सहाय्य करून मोलाची मदत केली. इनरव्हील क्लबच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शोभना पालेकर यांच्या हस्ते कायापालट केलेल्या नवीन वर्गाचे उद्धाटन करण्यात आले.यावेळी अध्यक्षा प्रतिभा डांगी, माजी अध्यक्षा ध्वनी तन्ना, सेक्रेटरी वैशाली करारिया,खजिनदार हेतल बालड, एडिटर ममता ठक्कर, विजयता कोठारी, मिनी राजपुत, अरुंधती बंडसोडे, शिल्पी भोनसुले, तनिशा चेतवानी, प्रिया चातुर्वेदी तसेच वीर वुमेन्स फाऊंडेशनच्या किर्ती मुनोत व श्रुती निसर, शिक्षिका सोनल गावंड, शिक्षक गणेश खैरे, सरपंच संगीता राजेंद्र पाटील, केंद्रप्रमुख अंकिता हुदार, स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन सीमा पारधी, विमल ठाकरे, तुळसा, गिरा, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते . उपस्थितांकडून मनापासून संस्थेच्या कार्याचे कौतुक करण्यात आले . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्ये करून आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली . कार्यक्रमानंतर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले .