वृक्षारोपण मोहिमेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा,महाविद्यालये,सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनीधींची बैठक
पनवेल दि.दि.22 : ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पनवेल महानगरपालिकेने व्यापक वृक्षारोपण मोहिम हाती घेतली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील विविध जागा, रस्ते दुभाजक तसेच इतर शासकीय जागांवरती वृक्षारोपण मोहीम राबविण्याच्या अनुषंगाने आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 22 मे रोजी महापालिका मुख्यालयात महापालिका मनपा कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये, एनएसएस विभाग शिक्षक ,पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनीधींची नियोजन बैठक अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात आयोजित करण्यात आली.
या बैठकिस उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त अभिषेक पराडकर, पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, महापालिका कार्यक्षेत्रातील वीसहून अधिक विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ‘माझी वसुंधरा’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मोकळ्या जागा, रस्ते दुभाजक तसेच इतर शासकीय जागांवरती व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्याच्या दृष्टीने महापालिकेने वृक्ष लागवड समितीची स्थापना केली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी व रक्षणासाठी शहरातील सर्व भागधारकांनी वृक्षारोपण संकल्प आणि प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. यासाठी महापालिकेच्या वृक्ष लागवड समितीच्यावतीने आयुक्त गणेश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल शहरातील शाळा, महाविद्यालये प्रतिनिधी, एनएसएस विभाग शिक्षक, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांची बैठक घेण्यात आली.
अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे
यावेळी अतिरीक्त आयुक्त श्री. शेटे यांनी उपस्थित प्रतिनिधींना महापालिकेच्या व्यापक वृक्षारोपण मोहिमेमध्ये सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगितले. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होण्याबाबत विनंती केली. तसेच सामाजिक संस्थानी , स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन वृक्ष लागवड केल्यानंतर याचे दायित्व स्वीकारावे. जेणे करून रोपण केलेल्या झाडांची व्यवस्थितरित्या वाढ होईल. यासाठी सामाजिक संस्थांना लागणारी सर्व सहकार्य महापालिकेच्यावतीने करण्यात येणार असल्याचे अतिरीक्त आयुक्तांनी सांगितले.
महापालिकेच्या या प्रस्तावास उपस्थित सर्व शाळा प्रतिनिधींनी, सामाजिक संस्थानी , स्वयंसेवी संस्थांनी एकमताने होकार दिला. तसेच महापालिकेस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी उपस्थितांनी देखील आपल्या सुचना सांगितल्या. या सर्व सूचनांचे स्वागत करून आतिरीक्त आयुक्तांनी महापालिकेच्या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल सर्व सामाजिक संस्थांचे ,व स्वयंसेवी संस्थांचे आभार मानले.