पनवेल फुटबॉल लीग २०२५ चे आयोजन; स्थानिक फुटबॉलसाठी भव्य पर्व
१६ व १७ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात हि स्पर्धा पंडित दीनदयाल उपाध्याय मैदान, सेक्टर ७, खारघर येथे होणार आहे. या लीगमध्ये ८ निवडक संघ आपले कौशल्य सादर करण्यासाठी आणि विजेतेपदासाठी मैदानात भिडणार आहेत. परदेशात फुटबॉल प्रिमिअर लीग खेळली जाते, ती स्पर्धा लहान आयोजनातून उत्तरोत्तर मोठी झाली आणि या स्पर्धेचा जगभर नावलौकिक झाला. आपल्या देशात विशेषतः हा खेळ क्रिकेटप्रमाणे जास्त खेळला जात नाही. मात्र शारीरिक व्यायाम व तंदुरुस्तीच्या बाबतीत हा खेळ गणला जातो. या आयोजनाच्या प्रयत्नातून या खेळाची आवड तरुणाईमध्ये निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी पनवेल लीगच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. तरुणांना प्रोत्साहन देणारा आणि एकोपा निर्माण करणारा हा खेळ असल्याने या खेळाचाही प्रसार व प्रचार झाला पाहिजे आणि स्थानिक फुटबॉलपटूंना व्यासपीठ मिळाले पाहिजे या दृष्टिकोनातून या पनवेल फुटबॉल लीगचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रँड ऑक्शनद्वारे संघ रचना झाली असून खारघर किंग, तळोजा टायटन्स, कळंबोली वॉरिअर्स, कामोठे नाईट्स, पनवेल सिटी फुटबॉल क्लब, पनवेल पॅन्थर, न्यू पनवेल युनायटेड, खांदा कॉलनी स्ट्रायकर्स या आठ संघाचा आणि नामवंत खेळाडूंचा सहभाग असणार आहे. "पनवेल फुटबॉल लीग ही स्पर्धा फक्त खेळापुरती मर्यादित नाही तर तरुणांना खेळाकडे वळविणारा एक सामाजिक उपक्रम ठरणार आहे तसेच या माध्यमातून खेळाडूंना पुढील स्तरावर जाण्याचा मार्ग मिळणार आहे.