लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये दोन दिवसीय नाट्य महोत्सवाची पर्वणी
पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये दोन दिवसीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 'एका लग्नाची पुढची गोष्ट' आणि 'कुटुंब किर्रतन' या सुप्रसिद्ध अशा दोन विनोदी नाटकांची पर्वणी नाट्य रसिकांना मिळणार आहे.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवार दिनांक ०१ जून रोजी सायंकाळी ०४ आणि रात्री ०८ वाजता सुप्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेते प्रशांत दामले, तसेच कविता मेडेकर अतुल तोडणकर यांची प्रमुख भूमिका असलेले 'एका लग्नाची पुढची गोष्ट' तर मंगळवार दिनांक ०२ जून रोजी सायंकाळी ०४ आणि रात्री ०८ वाजता सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, तन्वी मुंडले, अमोल कुलकर्णी आणि वंदना गुप्ते यांची भूमिका असलेले 'कुटुंब किर्रतन' या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
या नाटकांची प्रवेशिका विनामूल्य असून २८ मे पासून प्रवेशिका आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह तिकीट घर, द आय रूम, अमोल स्टेशनरीच्या बाजूला टिळक रोड, यशोमंगल सोसायटी समोर, पनवेल, पटवर्धन आयुर्वेदिक मेडिकल, लक्ष्मी सोसायटी, गोदरेज प्लाझा समोर, पनवेल या ठिकाणी उपलब्ध होणार असून अधिक माहितीसाठी अभिषेक पटवर्धन ८६६८३३२१५९, वैभव बुवा ९०२९४१०६९९ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.