पनवेल तहसील कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनाचा ६६ वा वर्धापन गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा
पनवेल(प्रतिनिधी)-पनवेल तहसील कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनाचा ६६ वा वर्धापन गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त पनवेल तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि राज्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला पनवेलचे उपविभागीय अधिकारी पावन चांडक, तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले आणि त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.