‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ निमित्त स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ निमित्त स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण



पनवेल,दि.16: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज १६ मे रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ साजरा करण्यात येत असून, यानिमित्ताने पनवेल महापालिकेच्यावतीने डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अमंलबजावणी करण्यासाठी आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आंबेडकर भवन येथे स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने प्रशिक्षण देण्यात आले.

उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या सूचनेनूसार घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी साथरोग वैद्यकिय अधिकारी डॉ. आकाश ठसाळ,  घनकचरा व स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे, वैद्यकिय अधिकारी,  स्वच्छता निरीक्षक संजय जाधव, आरोग्य पर्यवेक्षक प्रमोद गिरी उपस्थित होते.

 या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांना डास उत्पत्ती ठिकाणे कशी ओळखावी, ती नष्ट करण्याबाबत व पुन्हा तयार होऊ नयेत याची प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. तसेच बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी घेण्याविषयीची काळजी, धूर फवारणी, औषध फवारणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर औषध फवारणीची पध्दत, घरांमधील सर्वे याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.


चौकट

केंद्र शासनाने यावर्षीच्या राष्ट्रीय डेंग्यू दिनासाठी "तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा: डेंग्यूला हरविण्याचा उपाय हाच" हा संदेश दिला आहे. त्यानुसार शाळा, महाविद्यालये, भाजी मंडई अशा  विविध ठिकाणी  परिचारिकां व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


चौकट

डेंग्यू हा डासांमुळे होणारा आजार असून, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता राखणे, पाणी साठू न देणे, घरातील व घराबाहेरील जागा स्वच्छ ठेवणे, पाणी साठवणाऱ्या वस्तूंना झाकून ठेवणे अशा उपाययोजना राबवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन दक्षता घेतल्यास या आजाराला आपण नक्कीच आळा घालू शकतो.

---