दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रतिज्ञा

 दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रतिज्ञा




 

 

      नवी मुंबई- महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांच्यासमवेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, लेखा अधिकारी श्री.विजय रांजणे, सहा.आयुक्त श्रीम. अलका महापूरकर, श्रीम.स्वरूपा परळीकर, श्री.अरूण पाटील, इस्टेट मॅनेजर श्री.अशोक अहिरे, प्रशासकीय अधिकारी श्री.संजीव पवार आणि उपस्थित अधिकारीकर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण केलीयावेळी माजी पंतप्रधान स्वराजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

       “आम्हीभारताचे नागरिकआपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याव्दारेसर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करीत आहोत” अशी प्रतिज्ञा घेत महापालिका अधिकारीकर्मचारीवृंदाने “आम्ही प्रतिज्ञा करतो कीआम्ही सर्व मानवजातीमध्ये शांतीसामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करूतसेच मानवी जीवित आणि मूल्य धोक्यात आणणा-या विघटनकारी शक्तीचा प्रतिकार करू” असा प्रतिज्ञेचा मजकूर सामुहिकरित्या म्हटला.  


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image