कळंबोलीत भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा; १७ व १८ मे रोजी होणार थरारक सामने

 कळंबोलीत भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा; १७ व १८ मे रोजी होणार थरारक सामने



पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार १७ मे व रविवार १८ मे रोजी कळंबोलीत भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

        ही स्पर्धा रोडपाली येथील नवीन बस डेपो जवळील मैदानावर दिवस-रात्र रंगणार असून स्थानिक क्रिकेट प्रेमींसाठी ती पर्वणी ठरणार आहे. तसेच विविध संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार असून स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे, त्यामध्ये स्पर्धेतील प्रथम पारितोषिक २१ हजार १११ रुपये व भव्य चषक, द्वितीय क्रमांकाला ११ हजार १११ तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी ५ हजार ५५५ रुपये व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे परिसरातील युवकांना खेळातील कौशल्य दाखवण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.