मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा-विविध उपक्रमातंर्गत परिचारिकांच्या कार्याचा केला गौरव
नवी मुंबई : आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस हा दरवर्षी जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.
परिचारिका दिनानिमित्त, मेडिकव्हर हॉस्पिटलने परिचारिकांकरिता विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन केले होते यावेळी परिचारीकांविषयी कृज्ञता व्यक्त करुन त्यांच्या कामाचे कौतुकही करण्यात आले. आमच्या परिचारिका हेच आमचे भविष्य आहे आणि या परिचारिकांची काळजी घेणे ही अर्थव्यवस्थेला बळकटी आणते. या संकल्पनेतंर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्यसेवेतील परिचारिकांच्या निस्वार्थ सेवेचा आणि महत्त्वपूर्ण भूमिकेचा याठिकाणी सन्मान करण्यात आला.
रुग्णसेवेतील क्रांतीचा मागोवा घेणारी विशेष चित्रफित याठिकाणी सादर करण्यात आली. त्याचबरोबर नृत्याविष्कार, नाटक, गायन, फॅशन शो आणि विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी परिचारिकांना त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात सुमारे ६० परिचारिका सहभागी झाल्या होत्या.
परिचारिका हा आरोग्यसेवेचा मुख्य पाया आहे. निस्वार्थ रुग्णसेवा करत परिचारिका आपली भूमिका चोखपणे निभावतात. रुग्णांच्या पुनर्प्राप्तीसाठी आणि रुग्णालयांच्या सुरळीत कामकाजात त्यांचा मोठा वाटा आहे.
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये, आम्ही आमच्या परिचारिकांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचा कार्याला सलाम करतो. दैनंदिन कामाबरोबरच परिचारिकांना काही आनंदाचे क्षण घालविता यावे याकरिता हा उपक्रम राबविल्याची माहिती मेडिकव्हर हॉस्पिटल केंद्र प्रमुख डॉ. माताप्रसाद गुप्ता यांनी स्पष्ट केले. या खास निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांचा गौरव करण्यात आला.