.... तर कारवाई विरोधात जनआंदोलन होणार - ग्रामस्थांची भूमिका
पनवेल(प्रतिनिधी) न्हावे खाडी
चिखलात जसे कमळ फुलावे त्याप्रमाणे न्हावे खाडीमध्ये पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सुंदर आणि निसर्गरम्य उभारली गेली आहे. मात्र काही लोकांच्या वैयक्तिक कारणासाठी रामबागेवर तोडक कारवाई करण्याचे संकेत मिळाल्याने या कारवाईला प्रखर विरोध करण्याचा ठाम निर्णय न्हावे व गव्हाण विभागातील ग्रामस्थांनी घेतला असून तसा पुकार त्यांनी दिला आहे. लोकांच्या हितासाठी उभारलेली रामबाग अबाधित रहावी यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शेकडो ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन तोडक कारवाई थांबवावी अशी विनंती वजा मागणी केली आहे. यावेळी ग्रामस्थांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामस्थ जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले.
यावेळी न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे यांनी बोलताना सांगितले कि, विमानतळ, इमारती व इतर प्रकल्प बांधण्यासाठी सीआरझेडचे नियम सिडको पायदळी तुडवते. मात्र या ठिकाणी नियमाचा फार्स करून विशेषतः व्यक्तिगत राग काढण्याचा न्यायालयात आणि सिडकोत जाण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे रामबागेला सिडकोकडून नोटीस मिळाली. बागेवर कारवाई करण्यासाठी काहींची धडपड सुरु आहे. मात्र रामबाग परिसराचे वैभव आहे आणि त्यावर कुठलीही कारवाई होऊ नये यासाठी आम्ही ग्रामस्थ एकत्र आलो आहोत. रामबाग आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम नाही तर बगीचा आणि शौचालय आहे. लोकांसाठी असलेली हि बाग आहे आणि त्यासाठी येथे कुठलेही तिकीट नाही विनाशुल्क या बागेचा राज्यभरातील पर्यटक आनंद घेत आहेत. या ठिकाणी असलेली विविध प्रकारची झाडे समुद्र किनारा आणि निसर्गाला पूरक आहेत. हि बाग लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परिसराच्या वैभवासाठी आणि लोकांसाठी बांधली आहे त्यामुळे त्यावर ग्रामस्थांचा अधिकार राहिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना या बागेचे संरक्षण आणि विकास सिडकोने किंवा ग्रामपंचायतीने करण्याची मागणी आमदार महेश बालदी यांनी ग्रामस्थांच्या मागणीवरून यापूर्वीच सिडकोकडे केली आहे. असेही यावेळी त्यांनी नमूद केले. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, न्हावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सागर ठाकूर यांच्यासह पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
कोट- रामबाग अतिशय सुंदर आणि लोकांची बाग आहे. या ठिकाणी लहानग्यांपासून वृद्धापर्यंत हजारोच्या संख्येने लोक निसर्गाचा आनंद घेत असतात. आणि हि लोकांची संपत्ती हिरावून घेण्याची धमकी सिडको देत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रखर विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. तोडकी कारवाई होऊ नये यासाठी वेळ पडल्यास १९८४ प्रमाणे लढा देण्याचा निर्धारही केला आहे. - ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत
चौकट- चिखलाळ भरलेल्या खाडी परि