पनवेलमध्ये 'आंबा महोत्सव'ची धूम; तीन दिवसीय आंबा महोत्सवाला सुरुवात-सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमासह कोकणमेव्याची पर्वणी

पनवेलमध्ये 'आंबा महोत्सव'ची धूम; तीन दिवसीय आंबा महोत्सवाला सुरुवात-सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमासह कोकणमेव्याची पर्वणी 


                                                    

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल शहरात प्रथमच तीन दिवस ‘आंबा महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी पनवेल शहरच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील डॉ. पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराती शाळेच्या मैदानावर सुरू झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख मान्यवर शकुंतलाताई ठाकूर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. 

           या महोत्सवाच्या निमित्ताने महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते श्री.परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. उदघाटनाच्या दिवशी महिलांसाठी ‘खेळ खेळूया साऱ्याजणी चला जिंकूया अस्सल पैठणी’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने यावेळी महिलांनी मनमुराद आनंद लुटला. यासोबतच महोत्सवाच्या दुसऱ्या 

दिवशी म्हणजेच शनिवारी ‘अभंग रिपोस्ट’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच रविवार दिनांक १८ मे रोजी संगीत, नृत्य व कलेचा संगम 

असलेला‘वारसा संस्कृतीचा’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या महोत्सवात खवय्यांसाठी विविध प्रकारच्या आंब्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच, कोकणचा अस्सल स्वाद अनुभवण्यासाठी कोकण 

मेवाही उपलब्ध करून देण्यात आला आहे.            

        दरम्यान या महोत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी सदिच्छा भेट देत महोत्सवाचे कौतुक केले. या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून वर्षा प्रशांत ठाकूर,अर्चना परेश ठाकूर, ममता प्रीतम म्हात्रे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक राजू सोनी, प्रभाकर बहिरा, सुनिल बहिरा, संजय भगत, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी नगरसेविका सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, प्रीती जॉर्ज-म्हात्रे, सारिका भगत, डॉ. सुरेखा मोहोकर, पुष्पलता मढवी, नीता माळी, रेणुका मोहोकर, स्वाती कोळी, संजीवनी खिल्लारे, कोमल कोळी, अंजली काणे, सपना पाटील, प्रभाग अध्यक्ष पवन सोनी, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आयोजक माजी नगरसेविका रुचिता लोंढे, पनवेल मंडल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, अमित ओझे, केदार भगत, रुपेश नागवेकर, अभिषेक पटवर्धन यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.