अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त तालुका पूर्व मंडळात स्वच्छता अभियान, धार्मिक कार्यक्रम आणि वृक्षारोपण
पनवेल (प्रतिनिधी) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका पूर्व मंडळाच्या वतीने सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत शिवकर आणि चिपळे येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात स्वच्छता मोहीम, धार्मिक कार्यक्रम, शंखनाद आणि वृक्षारोपण अशा विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य म्हणजे सेवा, समाजभान, धर्मश्रद्धा आणि न्यायनीती यांचे प्रतीक होते. त्यांच्या कार्याचा गौरव करत पनवेल भाजप पूर्व मंडळाने हा उपक्रम घेतला. यामध्ये पदाधिकारी, ग्रामस्थ, कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि परिसराच्या स्वच्छतेबरोबरच जनजागृतीचा संदेश दिला.शिवकर येथील श्री शंकर मंदिरात सकाळपासूनच वातावरण भक्तिमय होते. सर्वप्रथम मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यानंतर सामूहिक शिव महाआरती, शंखनाद आणि भजनांचा कार्यक्रम झाला. यावेळी अनेक भाविकांनी उपस्थित राहून अध्यात्मिक वातावरणात सहभाग घेतला. चिपळे येथील शिवमंदिरातही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. कचऱ्याची विल्हेवाट आणि मंदिराभोवतालचा परिसर नीटनेटका करण्यात आला. या ठिकाणी देखील शिव महाआरती, शंखनाद, भक्तिगीते आणि भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला. विशेषतः वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
हा उपक्रम आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल तालुका पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या कार्यक्रमाला विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, अणेश ढवळे, युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील, उपाध्यक्ष धनंजय पाटील, ह.भ.प. विनोद पाटील, सुभाष पाटील, समीर दिनकर पाटील, महेंद्र पाटील, विशाल पाटील, अभिजीत फुलोरे, तन्मय पाटील, किरण पाटील, रोहित पाटील, पंढरीनाथ पाटील, समीर पाटील, विष्णू पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाच्या माध्यमातून भाजप पनवेल तालुका पूर्व मंडळाने सामाजिक बांधिलकी, धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरणपूरक विचार यांचे सुंदर मिश्रण साधले.