जातनिहाय जनगणना हा ऐतिहासिक आणि देशहिताचा निर्णय- आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल भाजपकडून जोरदार स्वागत आणि जल्लोष
पनवेल (प्रतिनिधी) भारत सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जात निहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली असून या महत्वपूर्ण निर्
प्रमुख उपस्थितीत पनवेल तालुका
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, एकनाथ गायकवाड, प्रभाकर बहिरा, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, अमित ओझे, रुपेश नागवेकर, केदार भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, नीता माळी, ज्योती देशमाने, शिवकर सरपंच आनंद ढवळे, सुनील पाटील, के.सी.पाटील, अक्षय सिंग, महेश पाटील, महेश सरदेसाई, अशोक मोटे, अविनाश गायकवाड, कर्णा शेलार, संदीप पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, देशाचे व जगातील कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि हा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. १९३१ नंतर प्रथमच जातनिहाय राष्ट्रीय जनगणना केली जाणार आहे. या निर्णयामुळे सामाजिक न्यायाच्या योजनांमध्ये सुधारणा होऊन समाजातील दुर्बल घटकाला पुढे आणण्याचा प्रयत्न आणि त्या पर्यायाने समाजाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असे सांगतानाच काँग्रेसने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे, ५० वर्षे सत्ता होती मग या काळात जातनिहाय जनगणना का केली नाही असा सवाल उपस्थित करतानाच काँग्रसेचे बेगडी प्रेम यातून स्पष्ट होत असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद करत जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी म्हंटले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा दिला आहे. तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाचा जल्लोष पाहून कॉग्रेसच्या पोटात दुखायला लागले आहे. राहुल गांधींची मागणी होती असे काँग्रेसकडून बोलले जाते मग घरात तब्बल ५० वर्षे सत्ता होती तेव्हा का निर्णय घेतला नाही असा सवाल करत काँग्रेसची फडफड आणि खोटा मुखवटा समोर असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानानुसार कार्य करत असतात त्यामुळे हा निर्णय सामाजिक न्याय पर्व आहे असेही अविनाश कोळी म्हणाले.