गोदरेज कॅपिटलची पनवेलमध्ये नवीन शाखा सुरु

 गोदरेज कॅपिटलची पनवेलमध्ये नवीन शाखा सुरु 


पनवेल शाखा उलवे, खारघर, तळोजा आणि आजूबाजूच्या भागांमध्ये सेवा देणार

पनवेल (प्रतिनिधी) गोदरेज कॅपिटलची उपकंपनी असलेल्या गोदरेज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने पनवेलमध्ये नवीन शाखेचे उ‌द्घाटन केले. विरारमध्ये पहिली शाखा आणि त्यानंतर पुणे पीसीएमसीमध्ये शाखा सुरु केल्यानंतर, कंपनीने महाराष्ट्रभर परवडणाऱ्या गृहवित्त सेवांवर लक्ष केंद्रित करत आपले स्थान बळकट केले आहे. ही नवी पनवेल शाखा उलवे, खारघर, तळोजा आणि इतर आजूबाजूच्या वाढत्या निवासी केंद्रांमध्ये स्वतःच्या मालकीचे घर असावे असे स्वप्न बाळगणाऱ्या ग्राहकांना अनुकूल गृहवित्तीय सेवा पुरवणार आहे.
         कंपनीचा मुख्य उद्देश म्हणजे परवडणाऱ्या किंमतीत स्वतःच्या मालकीचे घर मिळवून देणे. त्यासाठी कंपनी नोकरदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना पाच लाख रुपयांपासून गृहकर्ज तीस  वर्षापर्यंतच्या लवचिक कालावधीसह उपलब्ध करून देते. ही योजना स्वतःचे घर घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना विश्वासार्ह आर्थिक आधार प्रदान करून परवडण्यासंदर्भात असलेली दरी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते.
पनवेल हे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि सायन-पनवेल हायवेच्या जवळ असून येथे जलद पायाभूत सुविधा विकास होत आहे. यामध्ये आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMI), नव्या मेट्रो प्रकल्पांचा समावेश आणि अटल सेतू ब्रिजसारखी कनेक्टिव्हिटी वाढवणारी कामे होत आहेत. यामुळे परवडणाऱ्या घरांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सीमावर्ती बाजारपेठांतील वाढ आणि कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे पनवेल हे गृहखरेदीदारांसाठी किफायतशीर आणि सोयीचे निवासी केंद्र म्हणून अधिकच आकर्षक ठरत आहे. गोदरेज कॅपिटल लवकरच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आणखी 9 शाखा सुरू करण्याची योजना आखत असून, उच्च-वाढीच्या बाजारपेठांमध्ये स्व मालकीच्या घराच्या संधी वाढवण्याच्या आपल्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला चालना देत आहे.
            शाखा उ‌द्घाटन प्रसंगी, गोदरेज कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शाह म्हणाले, "घर घेणे हे बहुतेक भारतीय कुटुंबांसाठी सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक आहे आणि आम्ही ती यात्रा अधिक सुलभ, सर्वसमावेशक आणि सहजसोपी बनवण्यासाठी येथे आहोत. पनवेलमध्ये नवीन शाखा सुरु करून आम्ही केवळ शहरापुरते मर्यादित राहणार नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरांमधील गृहखरेदीदारांनाही पाठिंबा देणार आहोत. हा विस्तार म्हणजे आवश्यक त्या ठिकाणी सानुकूलित, पारदर्शक आणि विश्वासार्ह वित्तीय उपाय सादर करण्यासाठीच्या आमच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे."