पनवेल महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व साफसफाईच्या कामांची माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्याकडून पाहणी

पनवेल महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व साफसफाईच्या कामांची माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्याकडून पाहणी 

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेची मान्सूनपूर्व साफसफाईची कामे सुरू आहेत त्या संदर्भात पनवेल शहरामधील नालेसफाई, प्रगतीपथावर असलेली विविध विकास कामे, होल्डिंग पॉईंट तसेच पंपिंग स्टेशन व इतर ठिकाणांची पाहणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली. यावेळी काही ठिकाणी आवश्यक त्या सूचना पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
        यावेळी दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, डॉ. सुरेखा मोहोकर, प्रिती जॉर्ज म्हात्रे सारीका भगत, मुख्य अभियंता संजय कटेकर  व पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.