पनवेल महानगरपालिकेत कै.सदाशिव कवठे व कै. राहुल मोकाशी दिवंगत सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रध्दांजली

पनवेल महानगरपालिकेत कै.सदाशिव कवठे व कै. राहुल मोकाशी दिवंगत सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रध्दांजली

पनवेल,दि.7: आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रचंड लोकप्रिय असलेले जेष्ठ सहकारी अधिक्षक कै. सदाशिव कवठे तसेच युवा सहकारी स्वच्छता निरिक्षक कै. राहूल मोकाशी यांच्या निधनाने पनवेल महानगरपालिकेची मोठी हानी झाली आहे. अशा भावपूर्ण शब्दात आज पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या दिवगंत सहकाऱ्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व मौन बाळगुन भावपूर्ण श्रद्दांजली अर्पण करण्यात आली.

पनवेल महानगपालिकेचे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त सर्वश्री डॉ. वैभव विधाते, स्वरुप खारगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, लेखाधिकारी संग्राम व्होरकाटे, मुख्य लेखापरिक्षक निलेश नलावडे, उपलेखापाल  संजय जाधव,  पालिका सचिव अक्षय कदम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर तसेच पनवेल महानगपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

*आदर्शवत व्यक्तिमत्व कै. सदाशिव कवठे* 

शिक्षण, महसूल, करसंकलन आणि लेखा यांसारख्या महत्त्वपूर्ण विभागांमध्ये अत्यंत जबाबदारीने काम करुन लोकाभिमुख झालेले कै. सदाशिव कवठे हे लोकप्रिय असे व्यक्तिमत्व होते. संस्थेप्रती त्यांची आपुलकी संस्थेप्रती असलेला त्यांचा आदरभाव तसेच सर्व सहकाऱ्यांसमवेत असलेला स्नेहभाव या खेरीज संस्थे बाहेरील व्यक्तींशी असलेले त्यांचे आत्मीयतेचे संबंध हेच त्यांच्या अपार लोकप्रियतेचे वैशिष्ट होते. त्यांच्या या कार्यगुणांचा विचार करुन सर्वांनी तसे वागण्याचा प्रयत्न करावा हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे श्री मंगेश गावडे, डॉ. विधाते आणि सहकाऱ्यांनी यावेळी सांगितले. 

*होतकरु व प्रामाणिक कर्मचारी कै. राहूल मोकाशी*

स्वच्छता निरिक्षक म्हणून सोपावलेली जबाबदारी विनाविलंब व विनातक्रार सहजतेने पुर्ण करणारा एक युवा सहकारी म्हणजे कै. राहूल मोकाशी यांचे दुर्दवाने अपघाती निधन होणे ही बाब अजुनही मनाला पटत नाही. एक कर्तव्य भावना असलेला कर्मचारी आपण राहूलच्या रूपाने गमावला अश्या शब्दात त्यांच्या सहकाऱ्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. 

यावेळी झालेल्या शोकसभेत सर्वश्री  अरुण कांबळे, अनिल कोकरे, अनिल जाधव, यांनी ही आपल्या शोक भावना व्यक्त करून उभयतांना श्रध्दांजली वाहिली.