महेंद्रशेठ घरत यांनी केला आर. एस. लुईस यांचा सन्मान!
उरण दि १६(प्रतिनिधी)केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या बामर लॉरी लिमिटेडच्या उरण प्रकल्पातील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आर. एस. लुईस यांचा मंगळवारी (ता.१३) न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेतर्फे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी कृतज्ञतापूर्वक सन्मान केला. गेल्या १४ वर्षांपासून आर. एस. लुईस यांनी न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेला उत्तम सहकार्य केले. कामगारांबाबत त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. अनेक कामगारांना संधी दिली. लुईस यांना आता कलकत्ता येथील प्रकल्पात पदोन्नती मिळाली असून डायरेक्टर (बिझनेस सर्विसेस) या पदावर ते लवकरच रुजू होणार आहेत. त्यामुळे न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आर. एस. लुईस यांची उरण येथील प्रकल्पात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ, शाल देऊन सन्मान केला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बामर लॉरीचे अधिकारी राजेश राघवन, परशुराम भोईर, लंकेश ठाकूर, मनोहर ठाकूर, अजित ठाकूर, मनीष ठाकूर, संदीप वर्तक, सचिन भोईर, रवींद्र ठाकूर, जयेन ठाकूर, कल्पेश ठाकूर आदी उपस्थित होते.