सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेत खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल
सीबीएसई बारावीसाठी शाळेतून एकूण 205 विद्यार्थी बसले होते, ज्यात 162 विद्यार्थी विज्ञान शाखेचे आणि 43 विद्यार्थी वाणिज्य शाखेचे होते. सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या परीक्षा उत्तीर्ण केली असून विविध विषयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. यात 46 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा अधिक गुण मिळवले. 167 विद्यार्थ्यांनी 75%पेक्षा अधिक गुण मिळवत डिस्टिंक्शन प्राप्त केले. 100 पैकी 100 गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी 4 विद्यार्थी, गणित 1 विद्यार्थी, शारीरिक शिक्षण 1 विद्यार्थी, व्यवसाय अभ्यास 1 विद्यार्थी, अर्थशास्त्र 1 विद्यार्थी आहे.
सीबीएसई दहावीला शाळेतून एकूण 290 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात 90%पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले विद्यार्थी 115, 75%पेक्षा जास्त गुण (विशेष प्राविण्य) प्राप्त विद्यार्थी 232 असून विषयवार 100 पैकी 100 गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स 17 विद्यार्थी, डेटा सायन्स 23 विद्यार्थी, विज्ञान 3 विद्यार्थी, गणित 1 विद्यार्थी, इंग्रजी 2 विद्यार्थी, मराठी 1 विद्यार्थी आहेत.
या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शाळेतील प्रशिक्षित व समर्पित शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापिका राज अलोनी यांचे नेतृत्व आहे. मुख्याध्यापिका अलोनी यांनी सांगितले, हा 100% निकाल केवळ आकडा नाही, तर आमच्या विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि पालकांच्या अथक मेहनतीचे प्रतीक आहे. आमचे ध्येय केवळ शैक्षणिक यश नव्हे; तर मूल्याधिष्ठित, शिस्तबद्ध आणि नाविन्यपूर्ण शिक्षण देणे हे आहे. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल भविष्यातील नेतृत्व घडवणारी संस्था म्हणून सतत प्रगतिपथावर आहे आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तेजस्वी दीपस्तंभासारखी उजळत आहे. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करीत आनंद व्यक्त केला.