शिवसेना उपनेते व संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळेचा 10 वी चा निकाल 100%

शिवसेना उपनेते व संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळेचा 10 वी चा निकाल 100%

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः शिवसेना उपनेते व कमळ गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था तळोजाचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळांचा निकाल 100% लागल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यामध्ये द इलाईट पब्लिक स्कूल  (सीबीएसई बोर्ड ),  द इलाईट पब्लिक स्कूल ( स्टेट बोर्ड), कै.कमळ पाटील माध्यमिक विद्यालय,  अनुसया बबनदादा पाटील माध्यमिक विद्यालय या शाळांचा यंदाचा 10 वी चा निकाल 100% लागल्याने  विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे चेअरमन बबन दादा पाटील यांनी  अभिनंदन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.