इनरव्हील क्लब पनवेलतर्फे उद्यानात बेंचेस भेट; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

इनरव्हील क्लब पनवेलतर्फे उद्यानात बेंचेस भेट; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण 




पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानाच्या सौंदर्यात भर टाकण्याची महत्वपूर्ण कामगिरी इनरव्हील क्लब पनवेलने पार पाडली आहे. या उद्यानात येणाऱ्या मुलांसाठी चार बेंचेस तसेच आय डब्ल्यू सी चा लोगो लावण्यात आले असून त्याचे लोकार्पण लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष नगरसेवक अनिल भगत, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते, आय डब्ल्यू सी ३१३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर, वर्षा ठाकूर, विलास चव्हाण, राकेश भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पासाठी क्लब अध्यक्ष डॉक्टर विणा मनोहर, सुलभा निंबाळकर, वर्षा ठाकूर यांच्यासह सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन क्लबच्या नाव लौकिकात भर टाकली.
         यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी क्लबच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करून भविष्य काळातही क्लब कडून असे उत्तम उपक्रम होत राहतील अशा शुभेच्छा दिल्या. तसेच डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर आणि पास्ट प्रेसिडेंट मीनल टिपणीस यांना पुस्तक भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.