वृक्षारोपण मोहिमेद्वारे मेडिकव्हर हॉस्पिटलने साजरा केला जागतिक वसुंधरा दिन
रुग्णालयाच्या आवारात लावली ८० हून अधिक झाडं; वृक्ष संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा
नवी मुंबई : दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. पर्यावरण रक्षणाची जाणीव करून देणे आणि पर्यावरणाचे नुकसान होण्यापासून कसे वाचवता येईल यामागचा मुख्य उद्देश असून खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलने रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविली. या उपक्रमातंर्गत रुग्णालयाच्या वतीने रुग्णालय परिसरात ८० हून अधिक झाडे लावली. या उपक्रमात रुग्णालयातील प्रत्येक विभागप्रमुखांचा सक्रिय सहभागी झाले असून,वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन आणि काळजी घेण्याची प्रतिज्ञा देखील याठिकाणी घेण्यात आली.
वृक्षारोपण ही केवळ कृती नसून, तर ती भावी पिढीच्या आरोग्यासाठी, प्रदुषण कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यास व तापमान वाढीसारखा धोका कमी करण्यास मदत करते. झाडांमुळे हवेची गुणवत्ता सुधारते, तापमान कमी होते, हिरवळीमुळे तणाव कमी करण्यास मदत होते आणि श्वसन व हृदयरोगासारख्या समस्यांना प्रतिबंध करता येतो.
वृक्ष लागवड मोहिम ही भावी पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. या मोहिमेतून आपण पर्यावरणाचा समतोल राखत हवामान बदलांशी लढा देऊ शकतो. प्रदूषणाच्या समस्येने सर्वत्र उग्र रूप धारण केलेले असून, पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात नैसर्गिक ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. मेडिकव्हर हॉस्पिटल तंर्गत वृक्षारोपणाची मोहीम राबवित समाजामध्ये पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आल्याची प्रतिक्रिया मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी व्यक्त केली.
मेडिकव्हर हॉस्पिटल हे रुग्णसेवेच्या पलीकडे विचार करत समाजाच्या आरोग्यासाठी हितकारक उपक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण करत आहे. असे उपक्रम सर्वांना निरोगी सवयी अंगीकारण्साठी व निरोगी जीवन जगण्यासाठी तसेच त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणण्यास प्रेरित करतात.